Marathi Political News Sadabhau Khot Black Flags | Sarkarnama

सदाभाऊ खोतांना शेतकऱ्यांनी दाखविले काळे झेंडे

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 27 फेब्रुवारी 2018

स्वाभिमानी शेतकरी संघटना व कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांची रयत क्रांती संघटना यांच्यातल्या कलगीतुऱ्याचे पडसाद आज विदर्भात उमटले. मानोरा येथे स्वाभीमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी व काही शेतकऱ्यांनी सदाभाऊच्या वाहनाच्या ताफ्यासमोर येत काळे झेंडे फडकावून घोषणा दिल्या

वाशीम : स्वाभिमानी शेतकरी संघटना व कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांची रयत क्रांती संघटना यांच्यातल्या कलगीतुऱ्याचे पडसाद आज विदर्भात उमटले. मानोरा येथे स्वाभीमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी व काही शेतकऱ्यांनी सदाभाऊच्या वाहनाच्या ताफ्यासमोर येत काळे झेंडे फडकावून घोषणा दिल्या.

कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत हे मंगळवारी (ता. 27) वाशीम जिल्हा दौऱ्यावर आले होते. योगगुरू रामदेवबाबा यांच्या उपस्थितीत कारंजा येथे शेतकरी मेळाव्यात ते मार्गदर्शन करणार आहेत. तत्पूर्वी त्यांनी मानोरा येथे भेट दिली. मानोरा येथील शिव चौकात राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांचा वाहनाचा ताफा आल्यानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्त्यांनी त्यांना काळे झेंडे दाखवुन निषेध करीत घोषणा दिल्या. त्यामुळे काही काळ वातावरण तंग झाले होते. 

आंदोलकांना पांगवताना पोलिसांची मात्र भंबेरी उडाली. मालेगाव पोलिसांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष दामोदर इंगोले यांच्यासह कार्यकर्त्यांना सकाळीच ताब्यात घेतले होते. 

संबंधित लेख