Marathi Political News Raju Shetty Sadabhau Khot | Sarkarnama

सदाभाऊंची गाडी फोडणाऱ्या कार्यकर्त्याचा राजू शेट्टींनी केला सत्कार

भारत नागणे
मंगळवार, 27 फेब्रुवारी 2018

कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या गाडीवर दगडफेक करणाऱ्या माढा तालुक्यातील बापूसाहेब गायकवाड या स्वाभिमानी शेतकरी  संघटनेच्या कार्यकर्त्याचा जाहीर सत्कार करुन शेतकऱ्यांचा विश्वासघात करणाऱ्या मंत्र्यांना अशाच पध्दतीने उत्तर दिले जाईल, असे स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी जाहीर केले. 

पंढरपूर : कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या गाडीवर दगडफेक करणाऱ्या माढा तालुक्यातील बापूसाहेब गायकवाड या स्वाभिमानी शेतकरी  संघटनेच्या कार्यकर्त्याचा जाहीर सत्कार करुन शेतकऱ्यांचा विश्वासघात करणाऱ्या मंत्र्यांना अशाच पध्दतीने उत्तर दिले जाईल, असे स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी जाहीर केले. 

सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील भाबुंर्डी गावात स्वाभीमानीचा शेतकरी मेळावा झाला. यामेळाव्या प्रसंगी कृषीमंत्री सदाभाऊ खोत यांची कार्यकर्त्यांनी गाडी फोडल्याचा मला अभिमान असल्याचे सांगत त्यांनी जाहीर कार्यक्रमात बापू गायकवाड या माजी सैनिक असलेल्या कार्यकर्त्याचा  सत्कार केला. 24 फेब्रुवारी रोजी सदाभाऊ खोत सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना माढा तालुक्यातील रिधोरे गावात शेतकऱ्यांनी त्यांच्या गाडीवर दगडफेक करत घोषणाबाजी केली होती. खासदार शेंट्टींनी कार्यकर्त्यांनी केलेल्या दगड फेकीचे समर्थन केल्याने आगामी काळात रयत विरुध्द स्वाभिमानी असा वाद आणखी पेटण्याची चिन्हे आहेत.

संबंधित लेख