Marathi Political News Rajkumar Badole Bacchu Kadu | Sarkarnama

राजकुमार बडोलेंच्या घरात घुसणार : बच्चू कडू

तुषार खरात 
शनिवार, 3 मार्च 2018

अनोख्या पद्धतीने आंदोलने करून प्रश्नांचे गांभिर्य चव्हाट्यावर आणणारे आमदार बच्चू कडू यांनी आता आणखी एक नवे आंदोलन जाहीर केले आहे. अपंग व्यक्तींना मानधन व घरकूल देण्याचा निर्णय सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांच्याकडून घेतला जात नाही. त्यामुळे बडोले यांच्या घरात घुसून आंदोलन करणार असल्याचे आमदार कडू यांनी 'सरकारनामा'ला सांगितले.

मुंबई : अनोख्या पद्धतीने आंदोलने करून प्रश्नांचे गांभिर्य चव्हाट्यावर आणणारे आमदार बच्चू कडू यांनी आता आणखी एक नवे आंदोलन जाहीर केले आहे. अपंग व्यक्तींना मानधन व घरकूल देण्याचा निर्णय सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांच्याकडून घेतला जात नाही. त्यामुळे बडोले यांच्या घरात घुसून आंदोलन करणार असल्याचे आमदार कडू यांनी 'सरकारनामा'ला सांगितले.

अपंग व्यक्तींना मानधन व घरकूल योजना देण्याबाबत बडोले यांनी विधानसभेमध्ये दोन वेळा आश्वासने दिली आहेत. याबाबत आश्वासन समितीकडेही आपण पाठपुरावा करीत आहोत. पण या आश्वासनांची अद्याप अंमलबजावणी झालेली नाही. त्यामुळे बडोले यांच्या घरात घुसून आंदोलन करणार असल्याचे कडू म्हणाले.

कडू यांच्या या इशा-यामुळे बडोले व त्यांच्या कर्मचा-यांची आता चांगलीच पंचाईत होणार आहे. आमदार कडू आपल्या कार्यकर्त्यांसह केव्हाही बंगल्यावर धडक देतील. त्यामुळे बडोले यांच्या कर्मचा-यांना सतर्क राहावे लागेल, असे मत सूत्रांनी व्यक्त केले 

संबंधित लेख