धनगर आरक्षणासाठी बारामतीत मेळावा : पवार - जानकरांची व्होट बँक जवळ करण्याचा प्रकाश आंबेडकरांचा प्रयत्न

भारिप-बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी धनगर आरक्षणासाठी बारामती येथे स्वतंत्र मेळावा घेण्याची केलेली घोषणा नव्या राजकीय समीकरणाची नांदी ठरू शकते. मेळाव्यासाठी त्यांनी निवडेल्या ठिकाणाला राजकीय संदर्भ असल्याने अशा समीकरणांची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
धनगर आरक्षणासाठी बारामतीत मेळावा : पवार - जानकरांची व्होट बँक जवळ करण्याचा प्रकाश आंबेडकरांचा प्रयत्न

पुणे : भारिप-बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी धनगर आरक्षणासाठी बारामती येथे स्वतंत्र मेळावा घेण्याची केलेली घोषणा नव्या राजकीय समीकरणाची नांदी ठरू शकते. मेळाव्यासाठी त्यांनी निवडेल्या ठिकाणाला राजकीय संदर्भ असल्याने अशा समीकरणांची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. बारामती तालुक्‍यात धनगर समाजाची मोठी संख्या आहे. त्यामुळे एकाचवेळी शरद पवार व धनगरांचे नेते पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांच्या धनगर 'व्होट बॅंके'ला जवळ करण्याचा आंबेडकर यांचा उद्देश असल्याचे बोलले जात आहे. 

गेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपा-आघाडीचे उमेदवार म्हणून बारामती लोकसभा मतदारसंघातून महादेव जानकर यांनी निवडणूक लढविली होती. त्यांना बारामती विधानसभा मतदारसंघातही मतदारांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता. खडकवासला विधानसभा मतदारसंघातील शहरी भागातूनही जानकर यांना मोठा प्रतिसाद मिळाला होता. त्यामुळे राष्ट्रवादीच्या उमेदवार खासदार सुप्रिया सुळे यांचे मताधिक्‍क्‍य कमी झाले होते. या साऱ्या पार्श्‍वभूमीवर प्रकाश आंबेडकर यांची नवी राजकीय खेळी नव्या समीकरणांची नांदी तर नाही ना अशी चर्चा सरू झाली आहे. 

कोरेगाव-भीमा प्रकरणाच्या माध्यमातून भाजपा सरकारच्याविरोधात राजकीय वातावरण तापविण्यात आंबेडकर यशस्वी झाल्याचे सध्या तरी वातावरण आहे. त्यामुळे धनगर समाजाला आरक्षण मिळावे, ही भूमिका घेत बारामतीत मेळाव्या घेण्याच्या त्यांच्या व्यूव्हरचनेला विशेष महत्व आहे. राज्यातील तसेच केंद्रातील तत्कालिन काँग्रेस व राष्ट्रवादी सरकारच्या विरोधात सर्व समाज घटक एकत्र आणण्याचा यशस्वी प्रयोग भाजपा नेते गोपीनाथ मुंडे यांनी केला होता. त्यांचा हा प्रयोग कमालीचा यशस्वीदेखील झाला होता. त्यामुळे आंबेडकर यांच्या नव्या व्यूव्हरचनेला वेगळा अर्थ आहे. विशेष म्हणचे बारामती तालुक्‍यातील धनगर समाजाच्या काही नेत्यांनी घेतला पुढाकार आंबेडकर यांचा उत्साह वाढविणारा आहे. आंबेडकर यांची ही नवी व्यूव्हरचना खरेच यशस्वी होईल का हे येत्या काही महिन्यात स्पष्ट होईल. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com