पोटनिवडणुकीसाठी नाना पटोलेंची उमेदवारी? - प्रफुल्ल पटेलांच्या चालीला काँग्रेसचे उत्तर

भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व खासदार प्रफुल्ल पटेल यांनी दंड थोपटल्यानंतर काँग्रेसचे सारेच नेते खडबडून जागे झाले असून आता नाना पटोले यांनाच उमेदवारी मिळावी, यासाठी काँग्रेसच्या सर्व नेत्यांचे एकमत होऊ लागले आहे.
पोटनिवडणुकीसाठी नाना पटोलेंची उमेदवारी? - प्रफुल्ल पटेलांच्या चालीला काँग्रेसचे उत्तर

नागपूर : भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व खासदार प्रफुल्ल पटेल यांनी दंड थोपटल्यानंतर काँग्रेसचे सारेच नेते खडबडून जागे झाले असून आता नाना पटोले यांनाच उमेदवारी मिळावी, यासाठी काँग्रेसच्या सर्व नेत्यांचे एकमत होऊ लागले आहे.

खासदारकीचा राजीनामा दिल्यानंतर नाना पटोले यांनी लोकसभा पोटनिवडणूक आपण लढविणार नसून काँग्रेसच्या कार्यकर्त्याला उमेदवारी देण्यात येईल, असे जाहीर केले होते. त्यावेळी पटोलेंनी विधानसभा निवडणूक लढविणार असल्याचे स्पष्ट केले होते. उच्च न्यायालयाने पोटनिवडणुकीचा मार्ग मोकळा केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अचानकपणे सक्रिय झाले. ही जागा राष्ट्रवादीच्या वाट्याला असल्याने राष्ट्रवादी काँग्रेस निवडणूक लढणार असल्याचे जाहीर केल्याने काँग्रेसची चांगलीच पंचाईत झाली होती. प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांना नागपूरला तात्काळ पाठविले व अहवाल देण्यास सांगितले. यावेळी भंडारा-गोंदिया जिल्ह्यातील काँग्रेसच्या नेत्यांनी ही जागा आपल्याकडेच ठेवावी, अशी गळ टाकली. 

त्यामुळे आता उमेदवार म्हणून नाना पटोले यांचेच नाव काँग्रेसने समोर केल्याचे समजते. राष्ट्रवादीला उमेदवारी देण्यात आमदार गोपाल अग्रवाल यांनीही विरोध केला आहे. स्थानिक राजकारणात गोपाल अग्रवाल हे प्रफुल्ल पटेल यांचे विरोधक मानले जातात. अग्रवाल हे गोंदियाचे आमदार आहेत. अग्रवाल यांनाही पटेल यांचे वर्चस्व जिल्ह्यात नको आहे. त्यामुळे त्यांनी नाना पटोले यांच्या नावावर वजन टाकल्याचे समजते. लाखांदूर, आमगाव, तिरोडा, अर्जुनी मोरगाव, भंडारा तालुक्‍यातील काँग्रेस नेत्यांच्या बैठका घेऊन नाना पटोले यांना उमेदवारी द्यावी, असे ठराव प्रदेश काँग्रेसकडे पाठविण्यात आल्याचे समजते. या बैठका घेण्यासाठी नाना पटोले यांनीच पुढाकार घेतल्याचेही समजते. पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होण्यापूर्वीच कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राजकारण चांगलेच तापले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com