नगर हत्याकाडांचा पिंपरीत शिवसेनेकडून निषेध

केडगाव (जि.नगर) येथील शिवसेनेच्या दोन पदाधिकाऱ्यांच्या हत्येचा पिंपरी-चिंचवडमध्ये शिवसेनेकडून आज निषेध करण्यात आला. या गुन्ह्यातील आरोपींविरूद्धचा खटला जलदगती न्यायालयात चालवून त्यांना तातडीने कठोर शिक्षेची मागणीही करण्यात आली आहे.
नगर हत्याकाडांचा पिंपरीत शिवसेनेकडून निषेध

पिंपरीः केडगाव (जि.नगर) येथील शिवसेनेच्या दोन पदाधिकाऱ्यांच्या हत्येचा पिंपरी-चिंचवडमध्ये शिवसेनेकडून आज निषेध करण्यात आला. या गुन्ह्यातील आरोपींविरूद्धचा खटला जलदगती न्यायालयात चालवून त्यांना तातडीने कठोर शिक्षेची मागणीही करण्यात आली आहे. 

राज्यातील राजकारण अत्यंत खालच्या पातळीवर गेले असल्याबद्दल शिवसेनाप्रणीत शिवव्यापारी सेनेचे पिंपरी-चिंचवड शहर अध्यक्ष युवराज दाखले यांनी चिंता व्यक्त केली.एकमेकांवर कुरघोड्या करता-करता आता एकमेकांच्या जिवावर उठलेल्या नेत्यांवर आणि त्यांच्या कार्यकर्त्यांवर प्रशासनाने आळा घातला पाहिजे, असे ते म्हणाले. 

केडगावातील शिवसेनेचे शहर उपप्रमुख संजय कोतकर व वसंत ठुबे यांच्या हत्येचा रहाटणी, काळेवाडी शिवसेनेच्या वतीने जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला. तसेच या प्रकरणातील सर्व आरोपींना तत्काळ पकडून कडक शासन करावे, अशी मागणी तहसीलदारांकडेही करण्यात आली. केडगाव येथील सुवर्णनगर येथे शनिवारी (दि. 7) रात्री भर चौकात राजकीय वैमनस्यातून हे हत्याकांड झाले.हल्लेखोरांनी रिव्हॉल्व्हरमधून गोळीबार करून कोयत्याने वार करून दोघांची हत्या केली. याप्रकरणी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार संग्राम जगताप, आमदार अरुण जगताप, भाजपचे आमदार शिवाजी कर्डिले या तीन आमदारांसह 30 जणांविरोधात कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com