माजी मंत्री डाॅ. पतंगराव कदम यांचे निधन

माजी मंत्री डाॅ. पतंगराव कदम यांचे निधन

मुंबई - काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री पंतगराव कदम (वय 72) यांचे नुकतेच दीर्घ आजाराने मुंबईतील लीलावती रुग्णालयात निधन झाले. भारती विद्यापीठाची स्थापना करून त्यांनी राज्यभरात शिक्षणाची गंगा पोचविण्यात महत्त्वाचे योगदान दिले. त्यांचे पार्थिव पुण्यातील भारती विद्यापीठात उद्या (ता. 10) सकाळी साडेदहा वाजता आणणार आहेत. सांगली जिल्ह्यातील कडेगाव येथे त्यांच्यावर सायंकाळी चार वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

पतंगराव कदम यांचा जन्म  १९४५ साली सोनसळ, सांगली जिल्हा येथे झाला. सात वेळा ते राज्याच्या विधानसभेवर निवडून गेले होते. ते महाराष्ट्रातील वने, मदत व भूकंप पुनर्वसन मंत्री होते.

बालपण आणि शिक्षण

सांगली जिल्हयातील ग्रामीण भागातील एका लहान शेतकरी कुटुंबात डॉ. पतंगरावांचा जन्म झाला.

कार्य :. पतंगराव कदम हे भारती विद्यापीठ युनिव्हर्सिटीचे संस्थापक असून ते याचे संस्थापक-कुलगुरु देखील आहेत. भारती विद्यापीठ युनिव्हर्सिटी पुणे याच्या छत्राखाली देश व परदेशामध्ये 180 शैक्षणिक संस्था असून ही भारतातील नामवंत व अग्रेसर संस्थांपैकी एक आहे. डॉ. कदम महाराष्ट्र विधानसभेवर चार वेळा निवडून आले असून ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे प्रतिनिधीत्व करतात.

डॉ. कदम सोनहिरा सहकारी कारखाना लि. वांगी, ता. कडेगाव, जि.सांगली, सागरेश्वर सहकारी सूत गिरणी व कृष्णा-वेरळा सहकारी सूत गिरणी लि. पलूस, जि.सांगली, ग्राहक भांडार आणि एक मल्टीशेड्यूल्ड बँक अशा अनेक सहकारी संस्थांचे संस्थापक आहेत.नवी दिल्ली आणि दुबई येथे त्यांनी अभियांत्रिकी, व्यवस्थापन आणि Computer Application यांची महाविद्यालये स्थापन केली आहेत.

पुरस्कार....त्यांच्या या सेवेची अनेक संघटनांनी दखल घेऊन त्यांना पुरस्कार दिले आहेत. “लोकश्री”, इन्स्टिट्यूट ऑफ इकॉनॉमिक्स, नवी दिल्ली यानी दिलेले, सामाजिक व शैक्षणिक योगदानाबद्दल “मानवता सेवा अवॉर्ड”, मराठा सेवा संघ यांनी शिक्षण क्षेत्रातील त्यांनी केलेल्या कामगिरीबद्दल प्रदान केलेला “मराठा विश्वभूशण पुरस्कार”, आयएमएम, नवी दिल्लीतर्फे देण्यात येणारा “एक्सलन्स अवॉर्ड इन एज्युकेशन”, “शहाजीराव पुरस्कार”, कोल्हापुरातील “उद्योग भूषण पुरस्कार” हे होत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com