गडकरींनी बांधले चतुर्वेदींच्या स्तुतीचे पूल : सतीश चतुर्वेदींची वाटचाल भाजपकडे?

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री सतीश चतुर्वेदी यांची पावले भाजपकडे दमदारपणे पडत असल्याचे बोलले जात आहे. काही दिवसांपूर्वी चतुर्वेदींच्या महाविद्यालयाच्या कार्यक्रमाला हजेरी लावण्यासाठी गडकरी विशेष विमानाने नागपुरात दाखल झाले. या कार्यक्रमात नितीन गडकरींनी चतुर्वेदींच्या स्तुतींचे अनेक पूल बांधल्याने अनेकांनी राजकीय वाऱ्याची दिशा कळून आली.
गडकरींनी बांधले चतुर्वेदींच्या स्तुतीचे पूल : सतीश चतुर्वेदींची वाटचाल भाजपकडे?

नागपूर : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री सतीश चतुर्वेदी यांची पावले भाजपकडे दमदारपणे पडत असल्याचे बोलले जात आहे. काही दिवसांपूर्वी चतुर्वेदींच्या महाविद्यालयाच्या कार्यक्रमाला हजेरी लावण्यासाठी गडकरी विशेष विमानाने नागपुरात दाखल झाले. या कार्यक्रमात नितीन गडकरींनी चतुर्वेदींच्या स्तुतींचे अनेक पूल बांधल्याने अनेकांनी राजकीय वाऱ्याची दिशा कळून आली.

नागपूरच्या राजकारणात काही वर्षांपर्यंत गडकरी व सतीश चतुर्वेदी यांच्यातील मतभेद टोकाचे होते. या दोन्ही नेत्यांनी एकमेकांवर विविध आरोप केले होते. परंतू, गेल्या चार वर्षात पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले. चतुर्वेदी सलग दोनवेळा विधानसभा निवडणुकीत पराभूत झाले. तसेच नागपूर शहर काँग्रेसवरील त्यांचे वर्चस्व संपुष्टात आले. माजी केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार व नागपूर शहर अध्यक्ष विकास ठाकरे यांच्याशी झालेल्या मतभेदांमुळे चतुर्वेदी नागपूर शहर काँग्रेसमधून जवळपास बेदखल झाले आहेत. पक्षशिस्त मोडल्याच्या आरोपावरून कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या निर्देशावरून सतीश चतुर्वेदी यांना कारणे दाखवा नोटीसही बजावण्यात आली आहे. यामुळे चतुर्वेदींची काँग्रेसमधील कारकिर्द संपल्यात जमा आहे.

या पार्श्‍वभूमीवर काही दिवसांपूर्वी सतीश चतुर्वेदी यांच्या प्रियदर्शिनी अभियांत्रिकी महाविद्यालयात आयोजित केलेल्या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना प्रमुख पाहुणे म्हणून निमंत्रित केले होते. या कार्यक्रमासाठी खास विशेष विमानाने गडकरींनी नागपूर गाठले व हा कार्यक्रम संपल्यानंतर ते लगेच दिल्लीला रवाना झाले. या कार्यक्रमात गडकरी काय बोलतात, याकडे साऱ्यांचे लक्ष लागले होते. आधीची दुश्‍मनी विसरून गडकरींनी चतुर्वेदींच्या स्तुतीची पूल बांधण्यास सुरूवात केली. शिक्षण क्षेत्रात चतुर्वेदींनी केलेल्या 'उल्लेखनीय कामगिरी'चा उल्लेख करण्यास गडकरी विसरले नाहीत.

काँग्रेस पक्षश्रेष्ठीकडून कारवाई होण्याची शक्‍यता असल्याने चतुर्वेदी यांनी आता भाजपला जवळ करण्यास सुरूवात केल्याचे बोलले जात आहे. काँग्रेसमधील शहरातील एक प्रमुख नेत्याला घेण्यास भाजपचे नेतेही उत्सुक आहेत. भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीत सतीश चतुर्वेदी यांना उतरविले जाऊ शकते, असेही बोलले जात आहे. गोंदिया भागात हिंदी भाषिकांचे वर्चस्व आहे. हे लक्षात घेऊन भाजपतर्फे ही चाल खेळली जाऊ शकते.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com