Marathi Political News Nitin Gadkary Amit Shaha Lunch Nagpur | Sarkarnama

अमित शहा यांनी घेतले गडकरींच्या घरी भोजन

सरकारनामा ब्युरो
रविवार, 4 मार्च 2018

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांचे आज नागपुरात आगमन झाल्यानंतर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या घरी दुपारी भोजन केले. त्रिपुरा व नागालॅंडमध्ये भाजपला विजय मिळाल्यानंतर शहा रा. स्व. संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्याशी चर्चा करणार आहेत.

नागपूर : भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांचे आज नागपुरात आगमन झाल्यानंतर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या घरी दुपारी भोजन केले. त्रिपुरा व नागालॅंडमध्ये भाजपला विजय मिळाल्यानंतर शहा रा. स्व. संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्याशी चर्चा करणार आहेत.

अमित शहा यांचे आज दुपारी 12 वाजता नागपुरात आगमन झाले. विमानतळावर खासदार अजय संचेती, आमदार गिरीश व्यास, आमदार अनिल सोले यांनी त्यांचे स्वागत केले. त्यानंतर ते लगेच रविभवनात गेले. तेथून ते भोजन करण्यासाठी रामनगरातील नितीन गडकरी यांच्या घरी गेले. गडकरी यांचे महाल भागातील वाडा पाडण्यात आला असून सध्या गडकरी रामनगरातील 'भक्ती निवास' मध्ये राहतात. नितीन गडकरी हे भाजपचे त्रिपुरा राज्याचे प्रभारी होते. त्यामुळे त्रिपुराचे मुख्यमंत्री ठरविण्याबाबत गडकरी यांचे मत जाणून घेतले. त्यापूर्वी रविभवनात भाजपच्या काही आमदारांनी अमित शहा यांची भेट घेतली. यावेळी नागपूर व विदर्भाच्या राजकीय स्थितीबद्दल चर्चा केल्याचे सांगण्यात आले. 

संबंधित लेख