राष्ट्रवादीचे आमदार झीरवाळ म्हणाले 'पोट वाढलय...नाही तर नाचलोही असतो!' 

राजकारणी अभिनेता असतो असे विनोदाने तर कधी टीकेसाठी सहज म्हटले जाते. ते सगळ्यांच्या अंगवळणीही पडले आहे. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नरहरी झीरवाळ खरोखरच अभिनेते आहेत. एका महाविद्यालयाच्या स्नेहसंमेलनात स्वतः त्यांनीच आपले विविध पैलु उलगडले. अगदी गाणेही म्हटले....आणि शेवटी म्हणाले, 'आता माझे पोट वाढलेय नाही तर नाचलोही असतो' त्याला दाद देत विद्यार्थ्यांनी सभागृह अक्षरशः डोक्‍यावर घेतले.
राष्ट्रवादीचे आमदार झीरवाळ म्हणाले 'पोट वाढलय...नाही तर नाचलोही असतो!' 

नाशिक : राजकारणी अभिनेता असतो असे विनोदाने तर कधी टीकेसाठी सहज म्हटले जाते. ते सगळ्यांच्या अंगवळणीही पडले आहे. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नरहरी झीरवाळ खरोखरच अभिनेते आहेत. एका महाविद्यालयाच्या स्नेहसंमेलनात स्वतः त्यांनीच आपले विविध पैलु उलगडले. अगदी गाणेही म्हटले....आणि शेवटी म्हणाले, 'आता माझे पोट वाढलेय नाही तर नाचलोही असतो' त्याला दाद देत विद्यार्थ्यांनी सभागृह अक्षरशः डोक्‍यावर घेतले. 

राजकीय नेते रुक्ष असतात, ही तक्रार राष्ट्रवादी काँग्रेसचे दिंडोरीचे आमदार नरहरी झीरवाळ यांच्याविषयी करता येणार नाही. कारण ते खरोखरच कलाकार आहेत. उदरनिर्वाहासाठी त्यांनी काही काळ आदिवासी युवकांचे कलापथकही तयार केले होते. त्याचा अनुभव मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या दिंडोरी महाविद्यालयाच्या स्नेहसंमेलनाला प्रमुख पाहुणे म्हणून ते गेले असताना आला. त्यांनी तिथे आपली कला सादर करुन युवकांचे व आयोजकांचे मन जिंकले. बाल विवाह, कुटुंब नियोजन यावर जनजागृतीपर 'बंधू- भगिनींनो विचार करा..... दोन पानांचा संसार करा.... मोठ्या या संसाराची होतीय माती.... लगीन करायची आता वाटतेय भिती.' हे गाणे त्यांनी सादर केले. विविध कोट्या करीत मुलांनी कलात्मकता अंगीकारावी असे आवाहन करीत 'मला वसतिगहात प्रवेश मिळाला तो कोणाच्या शिफारशीने नव्हे तर माझ्या कलेमुळे. आता माझ पोट वाढलय नाही तर मी नाचलोही असतो.' असे सांगत त्यांनी सगळ्यांचीच मने जिंकली. 

आमदार नरहरी झीरवाळ यांचे पिता सीताराम बारकु झीरवाळ यांचेही गावात एक कलापथक होते. पंचक्रोशीत जे जे बोलावतील तिथे सणावाराला त्यांचे कार्यक्रम होत असत. या कार्यक्रमांपासूनच नरहरी झीरवाळ यांनाही कलेची आवड निर्माण झाली. वडिलांचा हा वारसा त्यांनी पुढे चालवला. त्यात लोकांची चांगलीच पसंती मिळु लागल्यावर ते वनार (ता. दिंडोरी) गावचे सरपंच झाले. पुढे पंचायत समिती, जिल्हा परिषद व 2004 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने उमेदवारी दिल्याने ते आमदार झाले. 

2009 मध्ये 149 मतांनी त्यांचा निसटता पराभव झाला होता. मात्र त्यानंतर 2014 मध्ये ते पुन्हा आमदार झाले. आजही ते सामाजिक उणीवा, वाईट प्रथा, बाल विवाह, कुटुंब नियोजन यावर आदिवासींत जनजागृती करीत असतात. त्यावेळी आपल्याला या पारंपारिक छंदाचा खुप उपयोग होतो असे त्यांनी 'सरकारनामा'ला सांगितले. एकंदर त्यांच्या गाणे, विनोद व शाब्दिक कोट्यांसह सादर केलेल्या कार्यक्रमातुन अनेकांना त्यांच्यातील कलाकार दिसला. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com