Marathi Political News NCP Hallabol Konkan | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

राणा जगजितसिंह उस्मानाबादचे राष्ट्रवादीचे उमेदवार : पवारांची घोषणा
सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय शिंदे यांचा शरद पवार यांच्या उपस्थितीत बारामतीत राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश...
हेमामालिनी या मथुरा येथून निवडणूक लढविणार
नरेंद्र मोदी वाराणशीतून, अमित शहा हे गांधीनगरमधून, नितीन गडकरी नागपूरमधून आणि राजनाथसिंह हे लखनौमधून निवडणूक लढविणार

राष्ट्रवादीची हल्लाबोल यात्रा ६ मे पासून कोकण, ठाण्यात

तुषार खरात 
गुरुवार, 12 एप्रिल 2018

सरकारच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसने काढलेल्या हल्लाबोल यात्रेला पश्चिम महाराष्ट्रात प्रचंड यश मिळाले. त्या पार्श्वभूमीवर आता ठाणे, पालघरसह संपूर्ण कोकणात हल्लाबोल यात्रा काढण्यात येणार आहे. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत पक्षाच्या काल झालेल्या बैठकीत हल्लाबोल यात्रेचे वेळापत्रक निश्चित करण्यात आले आहे.

मुंबई : सरकारच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसने काढलेल्या हल्लाबोल यात्रेला पश्चिम महाराष्ट्रात प्रचंड यश मिळाले. त्या पार्श्वभूमीवर आता ठाणे, पालघरसह संपूर्ण कोकणात हल्लाबोल यात्रा काढण्यात येणार आहे. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत पक्षाच्या काल झालेल्या बैठकीत हल्लाबोल यात्रेचे वेळापत्रक निश्चित करण्यात आले आहे.

हल्लाबोल यात्रा पालघर जिल्ह्यापासून सुरू होणार असून ती ठाणे, रायगड, रत्नागिरी व सिंधुदूर्ग जिल्ह्यातून प्रवास करणार आहे. ६ मे रोजी यात्रेला प्रारंभ होईल. प्रत्येक विधानसभा क्षेत्रात एक सभा या पद्धतीने यात्रेचे स्वरूप निश्चित केले आहे. ६ व ७ मे रोजी पालघर जिल्ह्यात, तर ११, १२ व १३ मे रोजी ठाणे जिल्ह्यात सभा होणार आहेत. उर्वरीत सभांच्या तारखा लवकरच जाहीर होतील असे सूत्रांनी सांगितले.

केंद्र व राज्यातील भाजपप्रणीत सरकारच्या धोरणांविरोधात जनजागृती करण्याचे लक्ष्य ठेवून राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने वेगवेगळ्या टप्प्यात हल्लाबोल यात्रा काढण्यात येत आहे. गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या या यात्रेला जनतेमधूनही चांगला प्रतिसाद मिळत आहे. भाजप सरकारविरोधात जन माणसांमध्ये नाराजी पसरू लागली असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसने अचूक टायमिंग साधत हल्लाबोल यात्रेचा झंझावात सुरू केला आहे.

राष्ट्रवादीमध्ये अजितदादा यांच्यासह सुप्रिया सुळे, धनंजय मुंडे, जयंत पाटील, सुनील तटकरे या वक्त्यांची चांगली फळी तयार झाली आहे. या नेत्यांच्या भाषणांचा प्रभाव जनतेवर पडू लागला आहे. त्यामुळे पक्षातही जोष संचारला आहे. कोकणात राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रभाव कमी असला तरी जनतेमध्ये सरकारविरोधी वातावरण तयार झालेले आहे. त्यामुळे हल्लाबोल यात्रेला चांगला प्रतिसाद मिळेल, असे सूत्रांनी 'सरकारनामा'शी बोलताना सांगितले.

संबंधित लेख