आयुक्त तुकाराम मुंढेनी चिठ्ठी दिली अन् नाशिकची करवाढ झाली

शहराचा विकास करायचा असेल तर निधी आवश्यक असतो. नाशिककरांवर कमी कर आहे, असे कारण पुढे करीत आज मुख्यमंत्र्यांनी दत्तक घेतलेल्या नाशिककरांना सत्ताधारी भाजपने 33 ते 61 टक्के करवाढीचा जोरदार दणका दिला. यावेळी आयुक्त तुकाराम मुंढे यांनी चिठ्ठी लिहून दिली. महापौर रंजना भानसी यांनी तिचेच वाचन करुन करवाढीची घोषणा केली.
आयुक्त तुकाराम मुंढेनी चिठ्ठी दिली अन् नाशिकची करवाढ झाली

नाशिक : शहराचा विकास करायचा असेल तर निधी आवश्यक असतो. नाशिककरांवर कमी कर आहे, असे कारण पुढे करीत आज मुख्यमंत्र्यांनी दत्तक घेतलेल्या नाशिककरांना सत्ताधारी भाजपने 33 ते 61 टक्के करवाढीचा जोरदार दणका दिला. यावेळी आयुक्त तुकाराम मुंढे यांनी चिठ्ठी लिहून दिली. महापौर रंजना भानसी यांनी तिचेच वाचन करुन करवाढीची घोषणा केली. 

महासभेत निर्णय देण्याचा अधिकारी महापौरांचा असतो. मात्र, आजच्या महासभेत आयुक्त मुंढे यांनी चिठ्ठी लिहून महापौरांकडे दिली. त्यावर महापौरांनी निर्णय जाहिर केला. यामध्ये महासभेचे संकेत मोडले गेल्याचा आरोप विरोधी पक्षनेते तथा शिवसेना नेते अजय बोरस्ते यांनी केला आहे. 

या करवाढीला विरोधी शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस या सगळ्यांनीच सभागृह डोक्यावर घेत विरोध केला. करवाढ करताना निवासी दर सरासरी 33, अनिवासी 51 तर औद्योगिक करात 61 टक्के करवाढीला आज मंजुरी दिल्याने विरोधी सदस्यांनी संताप व्यक्त केला. करांची फेररचना करताना नव्याने विशेष स्वच्छता कर लागु करण्यात आला. तर पुर्वीची अ, ब, क व ड वर्गवारी पध्दत मोडून काढत सरसकट करवाढ करण्यात आली. करवाढ करताना भांडवली मुल्याच्या आधारे वाढ करण्याचा प्रशासनाचा रेटा नामंजुर करताना भाडेमुल्यावर आधारीत करवाढ करण्याची घोषणा महापौर रंजना भानसी यांनी केली. 

महासभेत मालमत्ता करवाढीचा प्रस्ताव सादर होणार असल्याच्या पार्श्‍वभूमीवर शिवसेनेसह काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने सुरुवातीपासूनचं आक्रमक भुमिका घेत प्रस्तावाला विरोध केला. विरोधकांकडून प्रस्तावाची चिरफाड होत असताना सत्ताधारी भाजपकडून मात्र समर्थन करण्यात आले. 

आयुक्तांनी लिहून दिला निर्णय 
करवाढीच्या विषयावर निर्णय देण्याचा अधिकार महापौरांचा असताना आयुक्त तुकाराम मुंढे यांनी महापौरांना निर्णय लिहून देत सभागृहाचे संकेत मोडले. महापौरांनी देखील आयुक्तांचा निर्णय वाचून दाखविल्याने मुख्यमंत्र्यांनी नियुक्त केलेल्या आयुक्त मुंढे यांचा भाजप नगरसेवकांवर दबाव असल्याचे दिसून आले. आऊटसोर्सिगं व करवाढीच्या मुद्यावर अनेक भाजप नेत्यांनी आयुक्तांना थेट विरोध करणे टाळले. करवाढीचे समर्थन करताना भांडवली मुल्यावर आधारीत करवाढ केल्यास अंसतोष वाढेल अशी भिती गटनेते संभाजी मोरुस्कर यांनी व्यक्त केली. याबाबत महापौरांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता सायंकाळी त्या कार्यक्रमात असल्याने संपर्क होऊ शकला नाही. 

यंदाच्या पंचवार्षिक कार्यकाळाला एक वर्ष पुर्ण होत असताना नाशिकला सत्ताधारी भाजपने करवाढीची दिलेली भेट आहे. त्याचा शिवसेना निषेध करते आहे.  शिवसेनेच्या वतीने काळा दिवस पाळण्याबरोबरचं शहरभर आंदोलन करील - अजय बोरस्ते, विरोधी पक्षनेते. 

लोकांनी आंदोलन केल्यास त्यांची समजूत काढू. विकासासाठी करवाढ आवश्यक आहे. - शिवाजी गांगुर्डे, स्थायी समिती सभापती.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com