शिवसेना नगरसेवकांनी काळे कपडे परिधान करुन केला छिंदमचा निषेध 

छत्रपति शिवाजी महाराजांविषयी आक्षेपार्ह विधान केलेला भाजपचा नगरचा माजी उपमहापौर श्रीपाद छिंदम यांच्या निषेधासाठी शिवसेनेचे नगरसेवक आज महासभेत काळे कपडे परिधान करुन आले होते. यावेळी त्यांनी घोषणा सुरु केल्यावर भाजपच्या महापौर रंजना भानसी यांनी छिंदमच्या निषेधाचा ठराव मंजुर केला. मात्र त्यानंतरही निषेधाच्या प्रस्तावाचे वाचन करावे असा आग्रह धरल्याने पुन्हा काही काळ गोंधळ झाला.
शिवसेना नगरसेवकांनी काळे कपडे परिधान करुन केला छिंदमचा निषेध 

नाशिक : छत्रपति शिवाजी महाराजांविषयी आक्षेपार्ह विधान केलेला भाजपचा नगरचा माजी उपमहापौर श्रीपाद छिंदम यांच्या निषेधासाठी शिवसेनेचे नगरसेवक आज महासभेत काळे कपडे परिधान करुन आले होते. यावेळी त्यांनी घोषणा सुरु केल्यावर भाजपच्या महापौर रंजना भानसी यांनी छिंदमच्या निषेधाचा ठराव मंजुर केला. मात्र त्यानंतरही निषेधाच्या प्रस्तावाचे वाचन करावे असा आग्रह धरल्याने पुन्हा काही काळ गोंधळ झाला. 

महापालिकेची महासभा आज झाली. यावेळी करवाढ, नोकर भरती, विकासकामे यावरुन तणावाचे वातावरण होते. त्यात छिंदम प्रकरणाने वातावरणात तणावाची भर पडली. शिवसेनेच्या सदस्यांनी काळे कपडे तर महिला सदस्यांनी काळ्या साड्या परिधान केल्या होत्या. महासभा सुरु होताच त्यांनी श्रीपाद छिंदम याने छत्रपती शिवाजी महाराजांविषयी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याचा विषय मांडून त्याचा निषेधाचा ठराव मांडण्यात आला. भारतीय जनता पक्षाचे स्पष्ट बहुमत असल्याने त्यावरुन वाद अपेक्षित होता. मात्र महापौरांनी प्रस्ताव मंजुर करु असे सांगितले.

मात्र, शिवसेनेचे गटनेते अजय बोरस्ते यांनी केवळ निषेध नको त्या प्रस्तावाचे वाचन करावे, असा आग्रह धरला. त्यावर सुधाकर बडगुजर, गटनेते विलास शिंदे, सत्यभामा गाडेकर आक्रमक झाले. त्यामुळे महापौरांनी माघार घेत प्रस्तावाचे वाचन केले. त्यानंतर महासभेचे कामकाज सुरु झाले. 122 सदस्यांच्या सभागृहात भारतीय जनता पक्षाचे 66 सदस्य आहेत. त्यामुळे शिवसेनेच्या प्रस्तावाला भाजपसह सर्वच सदस्यांनी निषेधाच्या प्रस्तावाचे समर्थन केले. त्यानंतर मात्र करवाढीच्या विषयावरुन रणकंदन सुरु झाले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com