मराठा क्रांती मोर्चाच्या लाखांच्या शिवगर्जनेची जागतिक नोंद

मराठा क्रांती मोर्चा शिव जन्मोत्सवामध्ये येथील गोल्फ क्‍लब मैदानावर झालेल्या कार्यक्रमात आज सकाळी पन्नास हजार नागीरक, विद्यार्थ्यांनी गगनभेदी शिवगर्जना केली. कोणत्याही इलेक्‍ट्रीक वाद्यांशिवाय पर्यावरणपुरक कार्यक्रमाला विद्यार्थी, समाजबांधव व नागरीक उत्साहाने सहभागी झाले होते. या शिवगर्जनेची 'अमेझींग वर्ल्ड रेकॉर्ड' मध्ये नोंद झाली.
मराठा क्रांती मोर्चाच्या लाखांच्या शिवगर्जनेची जागतिक नोंद

नाशिक : मराठा क्रांती मोर्चा शिव जन्मोत्सवामध्ये येथील गोल्फ क्‍लब मैदानावर झालेल्या कार्यक्रमात आज सकाळी पन्नास हजार नागीरक, विद्यार्थ्यांनी गगनभेदी शिवगर्जना केली. कोणत्याही इलेक्‍ट्रीक वाद्यांशिवाय पर्यावरणपुरक कार्यक्रमाला विद्यार्थी, समाजबांधव व नागरीक उत्साहाने सहभागी झाले होते. या शिवगर्जनेची 'अमेझींग वर्ल्ड रेकॉर्ड' मध्ये नोंद झाली. 

या कार्यक्रमासाठी विविध शाळांचे विद्यार्थी, शिवप्रेमी संघटनांचे कार्यकर्ते, नागरीकांनी सकाळी आठपासुनच मैदानावर गर्दी केली होती. ताल वाद्य पथकातर्फे वातावरण निर्मिती करण्यात आली. जिजाऊ ब्रिगेड, संभाजी ब्रिगेड आदी संघटनांचे पदाधिकारी संयोजन करीत होते. त्यासाठी शंभर फुट रुंद व चाळीस फुट उंचीचे भव्य व्यासपीठ उभारण्यात आले होते. त्यावर राजमाता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य प्रतिमा होत्या. केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे, महापौर रंजना भानसी, उपमहापौर प्रथमेश गिते, आमदार डॉ. अपूर्व हिरे, आमदार सीमा हिरे, सुनिल बागूल, माधुरी भदाणे, चंद्रकांत बनकर, संजय फडोळ, गणेश कदम, करण गायकर, डॉ. शैलेंद्र गायकवाड आदी उपस्थित होते. 

यावेळी एकाच वेळी पन्नास हजार जणांनी 'छत्रपती शिवाजी महाराज की जय' 'जय जिजाऊ', 'जय शिवाजी- जय भवानी' या घोषणांनी परिसर दुमदुमुन गेला. त्याची नोंद संबंधीत संस्थेने केल्यावर त्याचे प्रमाणपत्र व्यासपीठावरील नेत्यांना सुपूर्द केले. प्रारंभी पाच मुलींनी शहाजीराजे, राजमाता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांविषयी प्रबोधनात्मक भाषणे केली. यावेळी मैदानावर शिवाजी महाराजांची भव्य रांगोळी काढण्यात आली होती.  

'सकल मराठा समाज' संस्थेतर्फे यंदा तारखेनुसार शिवजयंती साजरी करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला होता. त्यात शहरासाठी सुनिल बागूल तर जिल्ह्यासाठी आमदार अपूर्व हिरे यांची अध्यक्ष म्हणुन नियुक्ती झाली होती. या समितीने जिल्हाभर फिरुन त्याबाबत जनजागरण केले. कोणाकडुनही वर्गणी जमा करु नये. त्याऐवजी समितीचे सदस्य, पदाधिकाऱ्यांनी स्वसहाय्यातुन हा कार्यक्रम करतील, असा निर्णय घेतला होता. त्यानुसार अतिशय नेटक्‍या पध्दतीने गोल्फ क्‍लब मैदानावर कार्यक्रमाचे आयोजन झाले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com