महापालिकेत राजकीय पक्षांचे क्रिकेट अन्‌ ढोलावर ठेका! 

गेले काही दिवस चाचपडणाऱ्या राजकीय पक्षांना महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी कार्यभार स्विकारताच नवा विषय मिळाला आहे. एकीकडे सत्ताधारी भाजप आणि विरोधक हातात हात घालुन बैठकांत व्यग्र आहेत. तर दुसरीकडे आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी परवेशद्वारावरच क्रिकेटचा खेळ मांडला. त्यानंतर आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी ढोल बडवत ठेका धरला. त्यामुळे महापालिका नव्हे राजकीय पक्षांच्या आंदोलनाचे ठिकाण बनले आहे.
महापालिकेत राजकीय पक्षांचे क्रिकेट अन्‌ ढोलावर ठेका! 

नाशिक : गेले काही दिवस चाचपडणाऱ्या राजकीय पक्षांना महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी कार्यभार स्विकारताच नवा विषय मिळाला आहे. एकीकडे सत्ताधारी भाजप आणि विरोधक हातात हात घालुन बैठकांत व्यग्र आहेत. तर दुसरीकडे आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी परवेशद्वारावरच क्रिकेटचा खेळ मांडला. त्यानंतर आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी ढोल बडवत ठेका धरला. त्यामुळे महापालिका नव्हे राजकीय पक्षांच्या आंदोलनाचे ठिकाण बनले आहे. 

खुल्या जागांवर करआकारणी होणार असल्याने विद्यार्थ्यांना मैदाने राहणार नाहीत, शाळांची मैदाने संकटात असल्याने त्यावरील करवाढ रद्द करावी यासाठी महापालिकेच्या प्रवेशद्वारावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे क्रिकेटचा खेळ मांडण्यात आला. आम आदमी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी करवाढीविरोधात ढोल बडवण्याचे आंदोलन केले. जितेंद्र भावे, अॅड प्रभाकर वायचळे यांनी त्याचे नेतृत्व केले. त्यात मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी झाल्याने नागरीकही आकर्षित झाले होते. ही दोन्ही आंदोलने नागरिकांमध्ये चर्चेचा विषय ठरली.  

महापालिकेला गेली वीस वर्षे उत्पन्नवाढीचा विषय देखील मनाला शिवला नव्हता. औद्योगिक संस्थांमुळे भरपुर जकात मिळत होती. दर बारा वर्षांनी येणाऱ्या सिंहस्थासाठी राज्य, केंद्र शासनाचा हमखास निधी मिळत असल्याने सुविधा, सेवा आणि प्रशासनाची घडी नीट बसविण्यासाठी स्वतःचे उत्पन्न वाढवले पाहिजे असे कोणालाही वाटलेच नव्हते. जकात संपल्यावर 'जीएसटी' आला. तिजोरीत चणचण अन कामकाजात सातशे कोटींचा स्पील ओव्हर. यातुन मार्ग काढण्यासाठी नव्या आयुक्तांनी मालमत्ता करात अठरा टक्के वाढ केली. त्यावरुन सगळेच संतप्त आहेत. सत्ताधारी भारतीय जनता पक्षा, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस गावोगावी बैठका घेऊन विरोध करीत आहेत. अन्य संघटना, राजकीय पक्ष त्यावर राजकीय ढोल बडविण्यात व्यग्र आहेत. त्यामुळे सध्या महापालिका सगळ्यांसाठी बातम्यांचे ठिकाण बनले आहे. त्याचीच शहरभर चर्चा आहे. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com