राष्ट्रवादीचे आमदार नरहरी झीरवाळ यांना मंदिरात कोंडले 

मांजरपाडा पाटबंधारे प्रकल्पासाठी संपादीत केलेल्या जमिनींसाठी कमी मोबदला मिळाल्याची प्रकल्पग्रस्तांची तक्रार होती. त्यावर सरकारकडून प्रतिसाद मिळत नसल्याने देनसाने (ता. पेठ) येथील ग्रामस्थांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नरहरी झीरवाळ यांसह अधिकाऱ्यांना गावातील मंदिरात कोंडले. गावकरी ऐकण्याच्या मनःस्थितीत नसल्याने प्रशासनाकडून त्यांच्या मनधरणीचे प्रयत्न सुरु आहेत.
राष्ट्रवादीचे आमदार नरहरी झीरवाळ यांना मंदिरात कोंडले 

नाशिक : मांजरपाडा पाटबंधारे प्रकल्पासाठी संपादीत केलेल्या जमिनींसाठी कमी मोबदला मिळाल्याची प्रकल्पग्रस्तांची तक्रार होती. त्यावर सरकारकडून प्रतिसाद मिळत नसल्याने देनसाने (ता. पेठ) येथील ग्रामस्थांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नरहरी झीरवाळ यांसह अधिकाऱ्यांना गावातील मंदिरात कोंडले. गावकरी ऐकण्याच्या मनःस्थितीत नसल्याने प्रशासनाकडून त्यांच्या मनधरणीचे प्रयत्न सुरु आहेत. 

पेठ व दिंडोरी तालुक्‍याच्या सीमेवरील देवसाने गावासह परिसरातील गावांची जमीन मांजरपाडा प्रकल्पासाठी संपादन करण्यात आली आहे. अद्याप धरणाचे काम सुरु झालेले नाही. मात्र त्याआधी गावठाणाचे योग्य पुर्नवसन, जमिनीचा मोबदला तसेच अन्य मागण्यांसाठी त्यांचा सातत्याने पाठपुरावा सुरु होता. यासंदर्भात आमदार झीरवाळ यांनी ग्रामस्थांच्या प्रश्‍नात लक्ष घातले होते. यासंदर्भात विधीमंडळात तारांकीत प्रश्‍न उपस्थित करण्याचे आश्‍वासन दिले होते. तसेच मोबदल्यासाठी जलसंपदा विभागाकडे पाठपुरावा करीत होते. मात्र, कोणतेच आश्‍वासन पूर्ण झाले नव्हते. गावातील काही घरांना तडे गेले होते. 

आज सकाळी आमदार झीरवाळ, पंचायत समिती सभापती एकनाथ गायकवाड आणि जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांसह गावाला भेट दिली. त्यात नाराज झालेल्या ग्रामस्थांनी आधी या सगळ्यांना घेराव घातला. त्यात मार्ग निघाला नाही. त्यामुळे नंतर त्यांना गावातील मंदिरात कोंडले. ही बातमी परिसरात कळताच खळबळ उडाली. पोलिसांसह विविध राजकीय नेत्यांनीही त्या गावाकडे धाव घेतला. मात्र, दुपारपर्यंत कोणाचेही समाधान न झाल्याने वाद सुरुच होता. यामुळे परिसरात खळबळ उडाली. राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या नेत्यांची मात्र त्यामुळे धावपळ झाली. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com