Marathi Political News Nano Car Shivsena Nashik | Sarkarnama

'आई वडिलांच्या सेवेसाठी' शिवसेना नेत्याने दिल्या दहा नॅनो गाड्या 

'आई वडिलांच्या सेवेसाठी' शिवसेना नेत्याने दिल्या दहा नॅनो गाड्या 
मंगळवार, 6 मार्च 2018

शहरातील इंदिरानगर भागातील प्रभाग क्रमांक 23 आणि 30 मधील ज्येष्ठांच्या सेवेसाठी शिवसेनेतर्फे प्रभागात जाण्या येण्यासाठी दहा वातानुकूलीत नॅनो कार च्या माध्यमातून सुरु केलेला  'आई-वडिलांची सेवा' हा उपक्रम कदाचित देशातला पहीलाच प्रयोग ठरेल. शिवसेनेचे युवा कार्यकर्ते ऋषिकेश वर्मा यांनी हा उपक्रम हाती घेतला आहे. येत्या महिनाभरात ही सेवा सुरु होईल.

नाशिक : स्वतःच्या आई वडिलांसाठी चार-चाकी गाड्या अनेक जण घेतात. त्यात विशेषही काही नाही. मात्र, येथील शिवसेनेचे नेते ऋषिकेश वर्मा यांनी आपल्या प्रभागातील प्रत्येक ज्येष्ठ नागरिकाची आई- वडिलांसारखी सेवा करण्याचेठरवले आहे. त्यांनी स्वखर्चाने दहा वातानुकुलीत नॅनो गाड्या खरेदी केल्या. या गाड्या प्रभागातील ज्येष्ठांच्या प्रवासासाठी उपलब्ध असतील. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाची ही सेवा चर्चेचा विषय ठरला आहे. 

शहरातील इंदिरानगर भागातील प्रभाग क्रमांक 23 आणि 30 मधील ज्येष्ठांच्या सेवेसाठी शिवसेनेतर्फे प्रभागात जाण्या येण्यासाठी दहा वातानुकूलीत नॅनो कार च्या माध्यमातून सुरु केलेला  'आई-वडिलांची सेवा' हा उपक्रम कदाचित देशातला पहीलाच प्रयोग ठरेल. शिवसेनेचे युवा कार्यकर्ते ऋषिकेश वर्मा यांनी हा उपक्रम हाती घेतला आहे. येत्या महिनाभरात ही सेवा सुरु होईल. पक्षाचे संपर्क प्रमुख अजय चौधरी आणि पक्षाच्या जेष्ठ नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली या उपक्रमाची आखणी केली आहे. या भागाची लोकसंख्या सुमाके ऐंशी हजार आहे. त्यामुळे या उफक्रमांचा अनेकांना लाभ होईल. 

या दोन्ही प्रभागांची व्याप्ती मोठी आहे. त्यात घरटी किमान एक तरी ज्येष्ठ नागरिक आहे. बहुतांश ज्येष्ठ नागरीक एकटे राहतात. अनेकांची मुले अन्य शहरात अथवा परदेशी असतात. हक्काचा आधार नसल्याने घराबाहेर अथवा बाजारात जायचे तर अनेक अडचणी येतात. रीक्षासाठी धडपड करावी लागते. ज्येष्ठांच्या या अडचणी लक्षात घेऊन वर्मा यांनी त्यांच्यासाठी श्रावण बाळ होण्याचा संपर्क केला आहे. 

या परिसरात या नॅनो गाड्या तैनात असतील. ज्येष्ठांची नोंदणी करुन त्यांना गरजेनुसार सकाळी सात ते दहा आणि सायंकाळी 5 ते 9 या वेळेत त्या उपलब्ध होतील. चालकांचा खर्च भागविण्यासाठी महिन्याला 150 रुपये शुल्क असेल. गाडीत सीसीटिव्ही कॅमेरेही असतील. त्याच बरोबर रुग्णावाहिकाही उपलब्ध करण्यात आल्या आहेत. 

संबंधित लेख