फरारी मुन्ना यादवची कोराडीच्या महालक्ष्मी मंदिरात हजेरी?

जंग जंग पछाडूनही मुन्ना यादव नागपूर पोलिसांच्या हातात आलेला नाही. परंतु, तो काही 'भक्तां'ना कोराडीतील महालक्ष्मी मंदिरात दिसून आला. मंदिराच्या परिसरात उभा असलेल्या मुन्ना यादवचे छायाचित्र लगेच व्हायरल झाले. या मंदिराच्या विश्‍वस्त मंडळावर उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे आहेत. हे मंदिर त्यांच्या मतदारसंघात आहे. या मंदिरात पोलिसांचा 24 तास पहारा असतो.
फरारी मुन्ना यादवची कोराडीच्या महालक्ष्मी मंदिरात हजेरी?

नागपूर : गेल्या चार महिन्यांपासून पोलिसांना गुंगारा देत फिरणारा भाजपचा माजी नगरसेवक मुन्ना यादव नागपूरपासून जवळच असलेल्या कोराडीतील महालक्ष्मी मंदिरात झळकल्याचे छायाचित्र व्हायरल झाले आहे. 

गेल्या ऑक्‍टोबर महिन्यात अजनी भागात मुन्ना यादव याने शेजारच्या महिलेला मारहाण व तिला जीवे मारण्याचा धमकी दिल्याचा गुन्हा अजनी पोलिस ठाण्यात नोंदविला आहे. तेव्हापासून मुन्ना यादव फरार आहे. त्याचा अटकपूर्व जामीन उच्च न्यायालयाने फेटाळल्यानंतरही तो पोलिसांना शरण आला नाही. मुन्ना यादव मुख्यमंत्र्यांच्या विश्‍वासातील मानला जातो. नागपुरातून महामंडळाच्या अध्यक्षपदाची बिदागी मिळालेल्या निवडक कार्यकर्त्यामध्ये मुन्ना यादवचा समावेश आहे. त्याची राज्याच्या असंघटित कामगार कल्याण मंडळाच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. तसेच नागपुरातील वर्धा मार्गावरील प्रसिद्ध साई मंदिराच्या विश्‍वस्त मंडळाच्या अध्यक्षपदीही मुन्ना यादव 'विराजमान' आहे. 

जंग जंग पछाडूनही मुन्ना यादव नागपूर पोलिसांच्या हातात आलेला नाही. परंतु, तो काही 'भक्तां'ना कोराडीतील महालक्ष्मी मंदिरात दिसून आला. मंदिराच्या परिसरात उभा असलेल्या मुन्ना यादवचे छायाचित्र लगेच व्हायरल झाले. या मंदिराच्या विश्‍वस्त मंडळावर उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे आहेत. हे मंदिर त्यांच्या मतदारसंघात आहे. या मंदिरात पोलिसांचा 24 तास पहारा असतो. तरीही नागपूर पोलिसांच्या 'चाणाक्ष' नजरेला मुन्ना यादव आढळला नाही. यामुळे मुन्ना यादवचे या परिसरातच वास्तव्य असावे, अशी शंका व्यक्त केली जात आहे. 

मुन्ना यादव कोराडी परिसरातील एका फार्म हाऊसवर राहत असल्याचा संशय आहे. हे फार्म हाऊसही एका राजकीय नेत्याचे असल्याचे बोलले जाते. महालक्ष्मीच्या दर्शनासाठी मुन्ना यादव आला होता काय? याबद्दल अद्यापही अधिकृतरित्या काहीही स्पष्ट झालेले नाही.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com