Marathi Political News Nagpur MLA Son | Sarkarnama

आमदारपुत्रावरील खुनाचा प्रयत्न करण्याचा गुन्हा मागे

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 1 मार्च 2018

काही महिन्यांपूर्वी पूर्व नागपूर मतदारसंघाचे भाजपचे आमदार कृष्णा खोपडे यांच्या सुपुत्रावर दाखल झालेला खुनाचा प्रयत्न करण्याचा गुन्हा पोलिसांनी मागे घेतला. अचानकपणे पोलिसांनी आमदार पुत्रावरील गंभीर गुन्हे मागे कां घेतला, याबद्दल तर्कवितर्क लावले जात आहे. आमदार खोपडे हे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या विश्‍वासातील मानले जातात. 

नागपूर : काही महिन्यांपूर्वी पूर्व नागपूर मतदारसंघाचे भाजपचे आमदार कृष्णा खोपडे यांच्या सुपुत्रावर दाखल झालेला खुनाचा प्रयत्न करण्याचा गुन्हा पोलिसांनी मागे घेतला. अचानकपणे पोलिसांनी आमदार पुत्रावरील गंभीर गुन्हे मागे कां घेतला, याबद्दल तर्कवितर्क लावले जात आहे. आमदार खोपडे हे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या विश्‍वासातील मानले जातात. 

नागपुरातील धरमपेठ भागातील एका बारमध्ये 20 नोव्हेंबर 2016 मध्ये झालेल्या वादात शुभम महाकाळकर या युवकाचा खून झाला होता. या प्रकरणात आमदार कृष्णा खोपडे यांचा मुलगा अभिलाष विरुद्धही खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल झाला होता. बारमध्ये पैसे देण्यावरून आमदारपुत्र अभिलाष याचे बारमालकाशी वाद झाला होता. या वादातूनच अभिलाष खोपडेचा मित्र असलेल्या शुभम महाकाळकर या युवकाचा खून झाला होता तसेच आमदारपुत्र व त्याच्या मित्रांनी बार मालक सावन उर्फ सनी बोमरतवारला मारहाण केली होती. यात बोमरतवार जखमी झाले होते. बोमरतवार यांनी आमदारपुत्रांविरुद्ध तक्रार दाखल केली होती. त्यामुळे पोलिसांनी आमदार पुत्रावर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला होता. दोन्ही गटांनी एकमेकांविरुद्ध गुन्हे दाखल केले होते.

याप्रकरणाचा तपास सध्या सीआयडीकडे आहे. सीआयडीने आमदारपुत्रांविरुद्ध दाखल झालेला खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा मागे घेतला आहे. आमदारपुत्रावर केवळ मारहाणीचे गुन्हे कायम ठेवले आहे. सीआयडीच्या या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. या प्रकरणी उच्च न्यायालयाने राज्य सरकारला नोटीस बजावली आहे.

संबंधित लेख