नगरचे तडीपार नाशिकच्या आश्रयाला...भाजप नेत्यावर हल्ला

राजकीय गुन्हेगारीचे केंद्र म्हणुन चर्चेत आलेल्या नगरच्या राजकीय व संघटीत टोळ्यांतील व राजकीय लागेबांधे असलेले तडीपार नाशिकच्या आश्रयाला आले आहेत. त्यामुळे पोलिस व नागरीक सगळेच त्रस्त झाले आहेत. बुधवारी यातील एका टोळीने भाजप नेते व माजी नगरसेवक कन्हय्या साळवे यांच्यावर प्राणघातक हल्ला केला. यामध्ये एक जण गंभीर जखमी झाला. भाजपने यावर संतप्त प्रतिक्रीया व्यक्त केली आहे.
नगरचे तडीपार नाशिकच्या आश्रयाला...भाजप नेत्यावर हल्ला

नाशिक : राजकीय गुन्हेगारीचे केंद्र म्हणुन चर्चेत आलेल्या नगरच्या राजकीय व संघटीत टोळ्यांतील व राजकीय लागेबांधे असलेले तडीपार नाशिकच्या आश्रयाला आले आहेत. त्यामुळे पोलिस व नागरीक सगळेच त्रस्त झाले आहेत. बुधवारी यातील एका टोळीने भाजप नेते व माजी नगरसेवक कन्हय्या साळवे यांच्यावर प्राणघातक हल्ला केला. यामध्ये एक जण गंभीर जखमी झाला. भाजपने यावर संतप्त प्रतिक्रीया व्यक्त केली आहे.

काल सायंकाळी वीस- पंचवीस जणांच्या टोळीने माजी नगरसेवक कन्हय्या साळवे यांच्या घरावर हल्ला केला. त्यात घरावर दगडफेक झाली. गाडीची तोडफोड झाली. त्त्यांची कार व दुचाकी वाहनाची तोडफोड झाली. त्यांच्या कुटुंबीयांवर हल्ला झाला. यावेळी त्यांचा मुलगा आशिष साळवे याच्यावर हल्ला झाल्याने संगीता साळवे यांनी हल्लेखोराचा शर्ट पकडला. आरडाओरडा झाल्याने नागरीकांची गर्दी होऊ लागताच गुन्हेगारांनी पळ काढला. या सर्वांनी आपले चेहरे कपड्यांनी झाकले होते. त्यातील दोघांचे चेहरे झाकलेले नव्हते. त्यामुळे ते बाबा शेख आणि अक्षय नाईकवाडे असल्याचे स्पष्ट झाले. 

या टोळीने जाताना केलेल्या हल्ल्यात साळवे यांचे अनुयायी व व्यवसायिक गजानन थोरात हे गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. हा हल्ला दहशत पसरविण्यासाठी झाल्याचे बोलले जाते. याबाबत उपनगर आणि नाशिकरोड पोलिस ठाण्यात दोन स्वतंत्र गुन्हे दाखल झाले आहेत. 

नगर, श्रीरामपुर येथील राजकीय लागेबांधे असलेले गुन्हेगार गेल्या काही दिवसांपासून तडीपार झाल्यावर जिल्ह्यातून हद्दपार असल्याने लगतचा व सोयीचा भाग म्हणुन नाशिकला तळ ठोकतात. यापूर्वीही अशा गुन्हेगारांना पोलिसांनी अटक केली होती. त्यांचे लक्ष प्रामुख्याने राजकीय पक्षाचे नेते असल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे. एका मोठ्या नेत्यावर हल्ल्याच्या इराद्याने आलेल्या तिघांना नाशिक रोडला अटक केली होती. आता नव्याने भाजप नेत्यावर हल्ला झाला. नगर येथील पोटनिवडणुकीवरुन झालेल्या हत्या व हल्ले हे प्रकरण ताजे आहे. नगरला पोलिसांची धरपकड सुरु असल्याने यातील काही संघटीत गुन्हेकार व राजकीय नेत्यांशी संबंधीत लोक नाशिक रोडला आल्याचे पोलिस निरीक्षक प्रभाकर रायते यांनी सांगितले. भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी यावर संताप व्यक्त करीत कारवाईची मागणी केली आहे. त्यामुळे या प्रकरणाला आता राजकीय वळण मिळण्याची शक्यता आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com