Marathi Political News MP Godse | Sarkarnama

खासदार गोडसेंच्या प्रयत्नातून पुन्हा तयार झाली नाशिकच्या कृषी टर्मिनलची फाईल

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 8 मार्च 2018

शेतक-यांच्या प्रश्नावर सगळेच भांडतात अन् राजकारण संपले की विसरतात. नाशिकच्या कृषि टर्मिनलचेही असेच झाले. मागच्या सरकारने त्याला मंजुरी दिली. मात्र, मंत्रालयाच्या आगीत ती फाईल हरवली. खासदार हेमंत गोडसे यांनी दोन वर्षे पाठपुरावा केला. त्यातुन ही फाईल पुन्हा तयार झाली. आता मंत्रीमंडळाकडून त्याला मंजुरी मिळणार आहे. 

नाशिक : शेतक-यांच्या प्रश्नावर सगळेच भांडतात अन् राजकारण संपले की विसरतात. नाशिकच्या कृषि टर्मिनलचेही असेच झाले. मागच्या सरकारने त्याला मंजुरी दिली. मात्र, मंत्रालयाच्या आगीत ती फाईल हरवली. खासदार हेमंत गोडसे यांनी दोन वर्षे पाठपुरावा केला. त्यातुन ही फाईल पुन्हा तयार झाली. आता मंत्रीमंडळाकडून त्याला मंजुरी मिळणार आहे. 

खासदार गोडसे यांनी आपल्या मतदारसंघातील शेती व शेतक-यांचा एक विषय़ मार्गी लावला आहे. त्यामुळे त्यांच्या पाठपुराव्याला यश आल्याने अनेकांनी त्यांचे कौतुक केले. नागपूर, ठाणे आणि नाशिक येथे कृषी टर्मिनलला सन २०१o साली तत्वत : मान्यता देण्यात आली होती. सदर टर्मिनलसाठी नाशिक जवळील सय्यदपिप्री येथे शंभर एकर जागा निश्चित करण्यात आलेली आहे. पंरतू, त्यानंतर मंत्रालयाला लागलेल्या आगीत पिप्री येथील टर्मिनलच्या प्रस्तावाचीही फाईल जळून खाक झाली होती. यामुळे या टर्मिनलच्या मंजुरीचे काम बारगाळले होते. काहीही झाले तरी शेतकऱ्यांच्या फायद्याचा ठरणाऱ्या टर्मिनलचा विषय मार्गी लावायचाच या भावनेतून खासदार गोडसे यांनी टर्मिनलचा प्रस्ताव पुन्हा तयार केला. सदर प्रस्ताव राज्य शासनाच्या कृषी व पणन विभागाकडे मंजुरीसाठी दिला. 

संबंधित लेख