खासदार साबळे गुरुवारी करणार कोल्हापुरात उपोषण

पक्षाचा खासदार नसलेल्या ठिकाणी भाजपचे खासदार आंदोलन करणार आहेत. त्यानुसार पिंपरी-चिंचवडकर खासदार अमर साबळे हे कोल्हापूर येथे उपोषण करून विरोधकांमुळे हे कामकाज न झाल्याचे जनतेला सांगणार आहेत.
खासदार साबळे गुरुवारी करणार कोल्हापुरात उपोषण

पिंपरीः गोंधळामुळे कामकाज न झालेल्या व नुकत्याच संस्थगित झालेल्या संसद अधिवेशनातील सत्ताधारी खासदार आता जनतेच्या दरबारात येणार आहेत. विरोधकांमुळे हे कामकाज न झाल्याचा आरोप करीत विरोधकांच्या मतदारसंघात भाजपचे हे खासदार येत्या गुरुवारी (ता.12) देशभर लाक्षणिक उपोषण करणार आहेत. तसा आदेश त्यांना पक्षश्रेष्ठींनी दिला आहे. त्यासाठी त्यांना आपापल्या मतदारसंघात जाऊन विरोधकांना लक्ष्य करण्यास पक्षाच्या चाणक्‍यांनी सांगितले आहे. पक्षाचा खासदार नसलेल्या ठिकाणी भाजपचे खासदार हे आंदोलन करणार आहेत. त्यानुसार पिंपरी-चिंचवडकर खासदार अमर साबळे हे कोल्हापूर येथे उपोषण करून विरोधकांमुळे हे कामकाज न झाल्याचे जनतेला सांगणार आहेत. 

संसदेच्या नुकत्याच संपलेल्या अधिवेशनात लोकसभेचे आठ, तर राज्यसभेत फक्त चार टक्के कामकाज झाले. साडेतीनशे तास वाया गेले. गेल्या 18 वर्षातील हे सर्वांत कमी कामकाज आहे, अशी माहिती साबळे यांनी आज येथे दिली. त्यामुळे 190 कोटी रुपये पाण्यात गेले, याचे खापर त्यांनी विरोधकांवर फोडले. यामुळे आमच्या तारांकित प्रश्‍नांना उत्तरे मिळाली नाहीत, असे सांगत त्यांनी खंत आणि कामकाज न झाल्याने अपराधीपणाची भावनाही व्यक्त केली.त्यामुळे संसदेत, जरी कामकाज झाले नाही, तरी ते जनतेच्या दरबारात आपली भूमिका मांडू, असे त्यांनी सांगितले. 

बिटकॉईन या क्रिप्टो चलनाव्दारे भारव्दाजसारख्यांनी लाभ उठवून बारा हजार कोटी रुपयांचा मालमत्ता लाभकर चुकविला असल्याचा दावा साबळे यांनी केला. असे अनेक भारद्वाज देशात असून त्यांनी वीस ते 25 हजार कोटी रुपये लुबाडल्याची शक्‍यताही त्यांनी वर्तविली. बिटकॉईनव्दारे होणाऱ्या फसवणुकीसंदर्भात गेल्यावर्षी राज्यसभेत प्रथम आवाज उठविला होता, असे ते म्हणाले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com