पीएंचा फर्स्ट क्लास रूबाब; आमदार मात्र अडगळीत!

रेल्वे प्रवासामध्ये आमदारांना असलेल्या विशेष आरक्षित कोट्यांच्या जागांचा फायदा त्यांचे स्वीय्य सहायक (पी.ए.) घेत आहेत. आमदारांचे नाव पुढे करून रेल्वेतील या जागा पीएंकडून बळकावल्या जात असल्याने अन्य ख-याखु-या प्रवाशी आमदारांना मात्र तृतीय श्रेणीचा प्रवास करावा लागत आहे. मुंबईवरून आपल्या मतदारसंघाकडे परतणा-या अनेक आमदारांना शुक्रवारी या कटू अनुभवाचा सामना करावा लागल्याचे सूत्रांनी सांगितले.
पीएंचा फर्स्ट क्लास रूबाब; आमदार मात्र अडगळीत!

मुंबई : रेल्वे प्रवासामध्ये आमदारांना असलेल्या विशेष आरक्षित कोट्यांच्या जागांचा फायदा त्यांचे स्वीय्य सहायक (पी.ए.) घेत आहेत. आमदारांचे नाव पुढे करून रेल्वेतील या जागा पीएंकडून बळकावल्या जात असल्याने अन्य ख-याखु-या प्रवाशी आमदारांना मात्र तृतीय श्रेणीचा प्रवास करावा लागत आहे. मुंबईवरून आपल्या मतदारसंघाकडे परतणा-या अनेक आमदारांना शुक्रवारी या कटू अनुभवाचा सामना करावा लागल्याचे सूत्रांनी सांगितले.

रेल्वेमध्ये आमदारांसाठी व्दितीय श्रेणीच्या वातानुकुलीत डब्यामध्ये राखीव जागा ठेवण्यात आलेल्या आहेत. विधीमंडळाच्या अधिवेशन कालावधीमध्ये आमदार दर आठवड्याला मतदारसंघातून मुंबईकडे नियमितपणे येत असतात. दर सोमवारी मुंबईमध्ये अधिवेशनासाठी यायचे, तर शुक्रवारी मुंबईवरून मतदारसंघात परतायचे ही पद्धत सगळेच आमदार अनुसरतात. त्यामुळे अधिवेशन कालावधीमध्ये आमदारांकडून राखीव जागांवर आपल्या नावाचे आरक्षण करण्याबाबत रेल्वेकडे मोठ्या प्रमाणात मागणी होत असते. बरेच आमदार रेल्वेऐवजी विमान किंवा स्वतःच्या खासगी गाडीने प्रवास करतात. तरीही या आमदारांच्या नावाने त्यांचे पीए जागा आरक्षित करून ठेवतात, व स्वतः प्रवास करतात. 

पीएंनी जागा व्यापल्यामुळे अन्य दुस-या प्रवासी आमदारांना व्दितीय वातानुकुलित श्रेणीचे आरक्षण मिळत नाही. त्याऐवजी तृतीय श्रेणीच्या डब्यातून त्यांना प्रवास करावा लागत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. मराठवाडा, विदर्भ व उत्तर महाराष्ट्रात आमदारांना या प्रकाराचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे पीएंच्या अतिक्रमणावर अंकुश लावण्याची गरज असल्याचे काही आमदारांनी 'सरकारनामा'शी बोलताना सांगितले.     

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com