परवानगीविना शिवजयंती मिरवणुक काढल्याने भाजप आमदार हिरे, बागूलांवर गुन्हा 

परवानगी न घेताच शिवजयंतीची मिरवणूक काढल्याने आयोजक भाजपचे आमदार डॉ. अपूर्व हिरे, प्रदेश नेते सुनिल बागूल, मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक चंद्रकांत बनकर यांसह विविध पंचवीस पदाधिकाऱ्यांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. सोमवारी झालेल्या शिवजयंती कार्यक्रमाची जागतिक स्तरावर नोंद झाली होती. आता गुन्हा दाखल झाल्याने नव्या वादाच्या ठिणगी पडली आहे.
परवानगीविना शिवजयंती मिरवणुक काढल्याने भाजप आमदार हिरे, बागूलांवर गुन्हा 

नाशिक : परवानगी न घेताच शिवजयंतीची मिरवणूक काढल्याने आयोजक भाजपचे आमदार डॉ. अपूर्व हिरे, प्रदेश नेते सुनिल बागूल, मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक चंद्रकांत बनकर यांसह विविध पंचवीस पदाधिकाऱ्यांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. सोमवारी झालेल्या शिवजयंती कार्यक्रमाची जागतिक स्तरावर नोंद झाली होती. आता गुन्हा दाखल झाल्याने नव्या वादाच्या ठिणगी पडली आहे.

सकल मराठा समाजातर्फे नाशिकला गोल्फ क्‍लब मैदानावर छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना कार्यक्रम झाला. त्यात सुमारे एक लाख नागरिक सहभागी झाले. अतिशय आखीव रेखीव व नियोजनबध्द कार्यक्रमामुळे त्याची चर्चा होती. कोणताही गट, पक्षाच्या झेंड्याऐवजी व कोणतिही वर्गणी न घेता हा कार्यक्रम झाला. त्यात संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे, जलसंपदा मंत्री गिरीष महाजन, महापौरांसह विविध लोकप्रतिनिधी सहभागी झाले होते. त्याची 'अमेझींग वर्ल्ड रेकॉर्ड' मध्ये नोंद झाली. 

मानवंदना व शिवगर्जनेचा कार्यक्रम झाल्यावर त्यात सहभागी झालेल्या कार्यकर्त, नागरिक व मुलांनी मैदानापासून पंचवटी कारंजापर्यंत शहरात मिरवणुक काढली. या पालखी मिरवणुकीचा दुपारी दोनला समारोप झाला होता. मात्र, पोलिसांनी केवळ मानवंदनेच्या कार्यक्रमाची परवानगी दिली होती. मिरवणूक काढण्याबाबत पोलिस आयुक्तांनी कलम 149 प्रमाणे आयोजकांना नोटीस बजावली होती. त्याचे उल्लंघन झाल्याने मुंबई नाका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली होती. 

या मिरवणुकीत शिवाजी महाराजांची वेशभूषा केलेल्या मुलांनी तलवार हातात घेतली होती. त्यामुळे शस्त्रबंदी आदेशाचा भंग झाल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. एकंदरच पोलिसांच्या या कार्यपध्दतीने आयोजक संतप्त झाले आहेत. यासंदर्भात मराठा क्रांती मोर्चाचे संयोजक तथा निवृत्त सहाय्यक पोलिस आयुक्त चंद्रकांत बनकर यांनी नाराजी व्यक्त केली. ''राज्य सरकारने गुन्हा दाखल केलाच आहे तर मिरवणुकीत संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भमारे यांच्या विरोधातही गुन्हा दाखल करावा. पोलिसांची कार्यपध्दती चुकीची आहे.'' असे बनकर यांनी 'सरकारनामा'ला सांगितले. 

शिवजन्मोत्सवाची पालखी मिरवणुक कोणत्याही राजकीय पक्षाची नव्हती. सकल मराठा समाजातर्फे होती. यासंदर्भात काही दिवसांपूर्वी गृहराज्यमंत्री रणजीत पाटील व महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांना तसे निवेदन दिले होते. तरीही सरकार गुन्हे दाखल करणार असले तर सामाजिक पातळीवरच पुढील निर्णय घेऊ -  
आमदार डॉ. अपूर्व हिरे, अध्यक्ष, शिवजयंती समिती, नाशिक. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com