मेहुल चोकसीने नागपुरातील व्यापाऱ्यालाही फसविले? नागपुरातील ज्वेलर्स देवेन कोठारींचा आरोप 

पीएनबी घोटाळ्यातील नीरव मोदी व मेहुल चोकसी या हिरे व्यापाऱ्यांनी नागपुरातील ज्वेलर्सला फसविल्याचे उघड झाले आहे. गीतांजली फर्मचा संचालक मेहुल चोकसीची भूमिका पीएनबी घोटाळ्यात प्रमुख असल्याचा दावा नागपुरातील कोठारी एमबी या ज्वेलरीच्या शोरुमचे संचालक देवेन कोठारी यांनी पत्रकार परिषदेत केला.
मेहुल चोकसीने नागपुरातील व्यापाऱ्यालाही फसविले? नागपुरातील ज्वेलर्स देवेन कोठारींचा आरोप 

नागपूर : पीएनबी घोटाळ्यातील नीरव मोदी व मेहुल चोकसी या हिरे व्यापाऱ्यांनी नागपुरातील ज्वेलर्सला फसविल्याचे उघड झाले आहे. गीतांजली फर्मचा संचालक मेहुल चोकसीची भूमिका पीएनबी घोटाळ्यात प्रमुख असल्याचा दावा नागपुरातील कोठारी एमबी या ज्वेलरीच्या शोरुमचे संचालक देवेन कोठारी यांनी पत्रकार परिषदेत केला. 

देवेन कोठारी नागपुरातील प्रसिद्ध ज्वेलर्स आहेत. त्यांची सीताबर्डी भागातील बाजारपेठेत कोठारी एमबी शोरुम आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार जवळपास चार वर्षांपूर्वी नीरव मोदी व मेहुल चोकसीच्या मालकीच्या गीतांजली फर्मचे दागदागिने विकण्याचा करार देवेन कोठारी यांच्याशी करण्यात आला. यासाठी देवेन कोठारी यांनी 30 लाख रुपयांचे 6 धनादेश गीतांजली फर्मला सुरक्षा ठेव म्हणून दिले. तसेच दागिन्यांच्या खरेदीसाठी 57 लाख रुपये वेगळे पाठविण्यात आले. या बदल्यात अनेक दिवस कोणतेही दागिने पाठविण्यात आले नाही. वारंवार चौकशी केल्यानंतर केवळ 95 हजार रुपये किंमतीचा माल पाठविण्यात आला. हे दागिने सुद्धा फार निकृष्ट दर्जाचे होते. तसेच गीतांजली फर्मकडून आलेले दागिने मूळ किंमतीपेक्षा 500 पटीपेक्षा अधिक किंमतीने विकावे, असा धोशा सातत्याने मेहुल चोकसीकडून लावला जात होता, असा आरोप कोठारी यांनी केला. 

याबद्दल गीतांजली फर्मकडे तक्रार करण्यात आली. त्यांच्याकडून कोणताही सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्याने अखेर देवेन कोठारी यांनी नागपुरातील सीताबर्डी पोलिस ठाण्यात फसवणुकीची तक्रार नोंदवली. पोलिसमध्ये तक्रार नोंदविण्यात आल्यानंतर ही तक्रार मागे घेण्यासाठी मेहुल चोकसीने धमक्‍या दिल्या. या दबावाला बळी न पडल्याने चोकसीने मुंबईत आपल्या विरोधात खोटी तक्रार दाखल केल्याचा दावा कोठारी यांनी केला. गीतांजली फर्मने बनावट कागदपत्रे तयार करून आपल्याला फसविण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप कोठारी यांनी केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com