विधानसभेच्या वारीसाठी मावळात मोर्चेबांधणी

लोकसभेबरोबरच विधानसभेचेही बिगुल वाजण्याची शक्यता बळावल्याने मावळ विधानसभेसाठी आतापासूनच जोरदार मोर्चेबांधणी सुरु झाली आहे.यावेळचीही युतीशिवाय विधानसभेची निवडणूक होणार असल्यामुळे मावळात तिरंगी लढत अटळ आहे. भाजपच्या या बालेकिल्यात विद्यमान आमदार संजय ऊर्फ बाळा भेगडे हे हॅटट्रिक करणार का याकडेही लक्ष लागलेले आहे.
विधानसभेच्या वारीसाठी मावळात मोर्चेबांधणी

तळेगाव स्टेशन : लोकसभेबरोबरच विधानसभेचेही बिगुल वाजण्याची शक्यता बळावल्याने मावळ विधानसभेसाठी आतापासूनच जोरदार मोर्चेबांधणी सुरु झाली आहे.यावेळचीही युतीशिवाय विधानसभेची निवडणूक होणार असल्यामुळे मावळात तिरंगी लढत अटळ आहे. भाजपच्या या बालेकिल्यात विद्यमान आमदार संजय ऊर्फ बाळा भेगडे हे हॅटट्रिक करणार का याकडेही लक्ष लागलेले आहे.

आमदारकीचे पारंपरिक मुख्य दावेदार भाजप, राष्ट्रवादीसोबतच शिवसेना काँग्रेसमध्येही इच्छुकांनी मोर्चेबांधणी सुरु केली आहे. दावेदारीचे इमले आणि एकूण इच्छुकांची संख्या पाहता,गेल्या पंचवार्षिकच्या तुलनेत पक्षांतराच्या कोलांटउड्या यावेळी अधिक प्रमाणात पडतील अशी शक्यता आहे. बंडखोरीचीही लागण होईल, असा अंदाज आहे. तळेगाव दाभाडे हेच मावळच्या राजकारणाचा केंद्रबिंदू असल्याने, उमेदवार शहरी की ग्रामीण याबाबत उत्सुकता आहे.

तळेगावचे विद्यमान उपनगराध्यक्ष सुनील शेळके यांनी गेल्या काही वर्षांपासून स्वखर्चाने चालू केलेली ग्रामविकासाची कामे आणि गेल्या वर्षभरापासून राबवित असलेल्या राजकीय तथा सामाजिक कामाचा अजेंडा पाहता, उमेदवारी निश्चित होण्याअगोदरच खुद्द भाजपामधूनच दुसरा दावेदार उभी राहिल्याचे चित्र आहे. या पार्श्वभूमीवर भाजपमधील गटबाजीचे दर्शनही अधूनमधून मावळात होत असते. गेल्या काही कार्यक्रमांतील सुनील शेळके यांची खासदार श्रीरंग बारणे यांच्याशी वाढती जवळीक आणि त्याहीपुढे जाऊन शिवसेनेच्या व्यासपीठावरील उपस्थिती लपून राहिलेली नाही. यावरुन शेळकेंनी शिवसेनेचा दुसरा पर्याय तयार ठेवल्याचे बोलले जाते.

स्वत्रंत्र पक्षीय निवडणुकांच्या रणधुमाळीत शेळके शिवसेनेकडून उभे ठाकल्यास, आजपावेतो अडगळीला गेलेल्या शिवसेनेला नवसंजीवनी मिळून भाजपाला सक्षम तिसरा पर्याय उभा राहणार आहे. विशेष म्हणजे भाजपचे माजी नगरसेवक गणेश भेगडे यांच्या नुकत्याच झालेल्या वाढदिवसाच्या पोस्टर्सवर बॅकग्राऊंडला विधानभवनाचा फोटो राजकीय विश्लेषकांना तोंडात बोटे घालणारा ठरला. त्यातून दुसरे भेगडे (बाळा भेगडेंऐवजी गणेश) सुद्धा आमदारकीसाठी तयारीत असल्याचे दिसून आले आहे.

मागील विधानसभेला गटबाजी उफाळून आलेल्या मावळच्या राष्ट्रवादीमधील एकीची उरलीसुरली शकले, गेल्या वर्षी झालेल्या जिल्हा परिषद आणि नगरपालिका निवडणुकांच्या निमीत्ताने उडून पडल्याने राष्ट्रवादी काँग्रेसला मरगळ आल्याचे चित्र आहे. राष्ट्रवादीकडून संत तुकाराम साखर कारखान्याचे उपाध्यक्ष बापूसाहेब भेगडे यांचेच एकमेव नाव सध्या जरी चर्चेच्या पटलावर असले तरी, त्यांच्या कडून मात्र याबाबत अदयाप अगतिकता दिसलेली नाही. वर मावळ लोकसभेचा खासदार शिवसेनेचा असला तरी, सेनेचे स्थानिक नेतृत्व मात्र भाजपच्या पारंपरिक प्रभावामुळे कायम झाकोळले गेल्याचे दिसते. मावळ काँग्रेस मात्र अद्यापही इतर पक्षांमधील नाराजांच्या आशेवर पक्षोद्धाराची आस लावून बसली आहे. जसजसा निवडणुकीचा काळ जवळ येत आहे मावळात तसतसे विविध तर्कवितर्क आणि राजकीय समीकरणांचा उजळणीला रंग चढत आहे.

विधानसभेतील हॅट्रिकसाठी पक्षनेतृत्व जो निर्णय देईल तो मान्य राहील मात्र लोकसभेसाठी इच्छुक नसल्याचे आमदार बाळा भेगडे यांनी सांगितले. निवडणुकीच्या काळापुरते राजकारण करुन, इतर वेळी तालुक्याच्या जनतेशी सामाजिक बांधिलकी म्हणून केवळ सेनेच्या राजकीय व्यासपीठावर जातोय. बाकी माझी निष्ठा,काम आणि कर्तृत्वाची दखल स्वपक्ष घेईल असा ठाम आशावाद सुनील शेळके यांनी व्यक्त केला.सगळेच डळमळीत आहे. लोकांना चांगल्याची पारख नाही तसेच पक्षातील गटबाजी आणि अंतर्गत कुरघोड्यांबद्दल त्रागा व्यक्त करत राजकीय जीवनात हारजीत चालूच असते.पक्ष हरतो माणूस नाही. पवार साहेबांनी आदेश दिल्यास लढण्यास तयार आहे, असा निर्वाळा बापू भेगडे यांनी दिला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com