'लग्न झाले का?' हा प्रश्न महादेव जानकरांना विचारायला हवा : धनंजय मुंडे

धनगर समाजाचे मागासलेपण तपासण्यासाठी राज्य सरकारने 'टाटा सामाजिक विज्ञान संस्थे'कडे (टीस) जबाबदारी दिली आहे. त्यासाठी सरकारने टीसकडे ४० प्रश्न दिलेले आहेत. त्यात 'लग्न झाले आहे का?' हा प्रश्न नमूद आहे. धनगर समाजाचे मागासलेपण तपासण्यासाठी या प्रश्नाचा काहीच संबंध नाही, असे सांगतानाच हा प्रश्न पहिल्यांदा पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांना विचारायला हवा, अशी कोपरखळी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी मारली.
'लग्न झाले का?' हा प्रश्न महादेव जानकरांना विचारायला हवा : धनंजय मुंडे

मुंबई : धनगर समाजाचे मागासलेपण तपासण्यासाठी राज्य सरकारने 'टाटा सामाजिक विज्ञान संस्थे'कडे (टीस) जबाबदारी दिली आहे. त्यासाठी सरकारने टीसकडे ४० प्रश्न दिलेले आहेत. त्यात 'लग्न झाले आहे का?' हा प्रश्न नमूद आहे. धनगर समाजाचे मागासलेपण तपासण्यासाठी या प्रश्नाचा काहीच संबंध नाही, असे सांगतानाच हा प्रश्न पहिल्यांदा पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांना विचारायला हवा, अशी कोपरखळी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी मारली.

अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त कामोठे (नवी मुंबई) येथे 'सर्व पक्षीय धनगर समाज आरक्षण एल्गार मेळाव्या'चे रविवारी आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी मुंडे बोलत होते. 'लग्न झाले आहे का?' हा प्रश्न अजब आहे. ४० मुद्यांमध्ये हा प्रश्न सामाविष्ट करण्याचे खूळ ज्याच्या डोक्यात आले, तो अधिकारी मला भेटला पाहीजे. त्याला धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही, असाही संताप मुंडे यांनी व्यक्त केला.

मुळातच 'टीस' ही स्वायत्त संस्था आहे. या संस्थेला कोणताही संवैधानिक दर्जा नाही. त्यामुळे या संस्थेने दिलेला अहवाल कायदेशीर पातळीवर टिकणार नाही. पण केवळ वेळ मारून नेण्यासाठी राज्य सरकारने 'टीस'कडे अभ्यास करण्याची जबाबदारी सोपविली आहे. 'टीस'चा अहवाल सुद्धा धनगर समाजाच्या विरोधातच येईल, अशी भितीही मुंडे यांनी व्यक्त केली.  

मी धनगर समाजामध्येच लहानाचा मोठा झालो. धनगर वाड्यावर मी बराच काळ राहिलो आहे. धनगर समाजाशी असलेले हे नाते मी विसरणार नाही. म्हणूनच धनगर आरक्षणाच्या प्रश्नावर मी विधानपरिषदेत सतत आवाज उठवत असतो. आरक्षणाच्या या चळवळीत समाजाच्या बरोबरीने लढा देणार असल्याचेही मुंडे यावेळी म्हणाले. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com