भाजपके जुमले, उन्ही की जुबानी : जयंत पाटलांचा भाषणाचा फंडा

पिंपरी-चिंचवडमधील हल्लाबोलची पहिली सभा दोन कारणांमुळे गाजली. घसा बसलेला असूनही अजित पवार यांनी चाळीस मिनिटे भाजपच्या दोन्ही सरकार व पिंपरी पालिकेतील राजवटीवर तडाखेबंद हल्लाबोल केला. तर, अभ्यासू अशा माजी अर्थमंत्री जयंत पाटील यांनी ही सभा गाजविली, ती त्यांच्या भाषणाच्या नव्या फंड्याने. दृकश्राव्य माध्यमाचा आधार घेतलेल्या त्यांच्या भाषणाने टाळ्या व शिट्या घेतल्या.
भाजपके जुमले, उन्ही की जुबानी : जयंत पाटलांचा भाषणाचा फंडा

पिंपरी : पिंपरी-चिंचवडमधील हल्लाबोलची पहिली सभा दोन कारणांमुळे गाजली. घसा बसलेला असूनही अजित पवार यांनी चाळीस मिनिटे भाजपच्या दोन्ही सरकार व पिंपरी पालिकेतील राजवटीवर तडाखेबंद हल्लाबोल केला. तर, अभ्यासू अशा माजी अर्थमंत्री जयंत पाटील यांनी ही सभा गाजविली, ती त्यांच्या भाषणाच्या नव्या फंड्याने. दृकश्राव्य माध्यमाचा आधार घेतलेल्या त्यांच्या भाषणाने टाळ्या व शिट्या घेतल्या. व्हिडिओ क्लिपव्दारे निवडणुकीपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी,भाजपने अध्यक्ष अमित शहा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली आश्वासने कशी फोल व फसवी ठरली हे त्यांनी त्यांच्याच निवडणुकीआधीच्या व नंतरच्या वक्तव्याच्या व्हिडिओ क्लिप दाखवित दाखवून दिले.

राष्ट्रवादीची मुलूखमैदान तोफ धनजंय मुंडे यांची उणीव अजितदादांनी पिंपरी-चिंचवडमध्ये जाणवू दिली नाही. उलट त्यांच्या जोरदार, तिखट हल्लाबोलला खरपूस अशी जोड जयंत पाटलांनी दिल्याने सभेचा नूर पालटला. फडणवीस यांचा उल्लेख त्यांनी फसणवीस असा करीत हशा व टाळ्या घेण्यास सुरवात केली. नंतर त्यांचे, मोदी, शहा भाजपच्या दोन्ही सरकारचे जुमले कसे फसले, हे त्यांच्याच वक्तव्याच्या क्लिप दाखवित दाखवून दिले. त्यामुळे अशा प्रत्येक फसलेल्या आश्वासनाच्या क्लिपला मोठा प्रतिसाद मिळाला.

परदेशातील काळा पैसा भारतात आणून प्रत्य़ेक भारतीयाच्या खात्यात 15 लाख रुपये जमा होतील, हे मोदी यांचे लोकसभा निवडणुकीपूर्वीचे आश्वासन त्यांनी भाषणात दाखविले. त्यावर निवडणुकीनंतर हा सर्व जुमला असल्याची शहा यांची क्लिप दाखविताच श्रोत्यांनी टाळ्यांचा  कडकडाट केला. दोन कोटी नोकऱ्यांच्या जुमल्यावरही पकोडे तळणे ही सुद्धा नोकरीच असल्याचे मोदींचे सांगणे, पंतप्रधान करू नका, पण देशाचे चौकीदार करा हे मोदींचे निवडणुकीपूर्वी सांगणे आणि नंतर निरव मोदी, चोक्सी आदींचे देशाला हजारो कोटी रुपयांचा चुना लावून परदेशात पळून जाणे, यातून त्यांनी भाजप, पंतप्रधान व शहा यांनी दिलेल्या आश्वासनांतील फोलपणा दाखवून दिला.

मोदी, शहा यांच्याजोडीने त्यांनी फडणवीस यांच्यावरही उपरोधिकपणे हल्लाबोल केला. त्यासाठी त्यांनी मेक इन महाराष्ट्र, मॅग्नेटिक महाराष्ट्र यांची उदाहरणे देत त्यासंदर्भातील फडणवीस यांच्या आधीच्या व नंतरच्या क्लिप दाखविल्या. माजी अर्थमंत्री एकनाथ खडसे यांचे विधानसभेतील उंदरावरील क्लिपही दाखवित त्यांनी भाजपला घरचा आहेर दिला. राज्य सरकारचे धनगर, मराठा, मुस्लिम आरक्षणाचे आाश्वासन हे कसे गाजर ठरले, हे सुद्धा त्यांनी दाखविले. एकूणच नेमस्त, शांत स्वभावाच्या पाटील यांचे लांडे-पाटलांच्या भोसरी गावातील भाषण चर्चेचा विषय झाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com