भाजपला बसणार धक्का? - हिरे कुटुंब राष्ट्रवादीत परतणार! 

महाराष्ट्राच्या राजकारणात प्रभावी मानले जाणाऱ्या हिरे घराण्यातील नेते पुढील आठवड्यात भाजपला सोडचिठ्ठी देऊन स्वगृही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये परतणार आहेत. माजी राज्यमंत्री प्रशांत हिरे, आमदार डॉ. अपूर्व हिरे आणि युवा नेते अद्वय हिरे यांच्या समर्थकांचा येत्या 21 एप्रिलला मालेगाव येथे मेळावा होईल. या मेळाव्यात ही घोषणा होण्याची शक्तया आहे. त्यामुळे भारतीय जनता पक्षाला लोकसभा निवडणुकीपूर्वीच मोठा झटका बसण्याची शक्यता आहे.
भाजपला बसणार धक्का? - हिरे कुटुंब राष्ट्रवादीत परतणार! 

नाशिक : महाराष्ट्राच्या राजकारणात प्रभावी मानले जाणाऱ्या हिरे घराण्यातील नेते पुढील आठवड्यात भाजपला सोडचिठ्ठी देऊन स्वगृही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये परतणार आहेत. माजी राज्यमंत्री प्रशांत हिरे, आमदार डॉ. अपूर्व हिरे आणि युवा नेते अद्वय हिरे यांच्या समर्थकांचा येत्या 21 एप्रिलला मालेगाव येथे मेळावा होईल. या मेळाव्यात ही घोषणा होण्याची शक्तया आहे. त्यामुळे भारतीय जनता पक्षाला लोकसभा निवडणुकीपूर्वीच मोठा झटका बसण्याची शक्यता आहे. 

दरम्यान यासंदर्भात येत्या शनिवारी (ता. 21) मालेगावला राधिका लॉन्स येथे हिरे समर्थकांची सहविचार सभा होणार आहे. त्यासाठी जिल्ह्यात हिरे घराण्याचे नेतृत्व मानणाऱ्या आजी, माजी पदाधिकारी, नेते व कार्यकर्त्यांना निमंत्रीत करण्यात आले आहे. त्यात याबाबतचा निर्णय होण्याची शक्‍यता आहे. या मेळाव्यासाठी अनुयायांना किती समर्थक आणावेत, काय ठराव मांडायचे तसेच अन्य विषयांचे 'स्क्रीप्ट' तयार असल्याचे समजते. हिरे गेले वर्षभर भाजपमध्ये अस्वस्थ होते. नाशिक पश्‍चिम विधानसभा, नाशिक व धुळे यापैकी एका लोकसभा मतदारसंघातुन त्यांना उमेदवारी अपेक्षीत होती. मात्र, भाजपमध्ये वरिष्ठ स्तरावर त्यांना कोणीही प्रतिसाद दिला नव्हता. त्यातुन राजकीय भविष्याचा विचार करुन ते पक्षाला राम राम ठोकणार असल्याचे बोलले जाते. हा भाजपला मोठा राजकीय धक्का आहे. 

माजी मंत्री पुष्पाताई हिरे या शरद पवार यांच्या मंत्री मंडळात प्रदिर्घकाळ आरोग्यमंत्री होत्या. शरद पवार यांच्या समर्थनार्थ झालेल्या बंडात सुरुपसींग नाईक यांच्या मंत्रीमंडळातून राजीनामा दिलेल्या सात मंत्र्यांत त्यांचा समावेश होता. प्रशांत हिरे देखील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोट्यातुन राज्यमंत्री होते. नाशिकच्या राजकारणात सध्या छगन भुजबळ आणि प्रशांत हिरे ही दोन प्रबळ घराणी सक्रीय आहेत. या दोघांतही विस्तवही जात नव्हता. मात्र, गेल्या काही दिवसांत भुजबळ समर्थकांमार्फत त्यांचा नियमित संपर्क होता. अद्वय हिरे यांनी छगन भुजबळ यांची कारागृहात भेट घेतली होती. 

ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी आपल्या नाशिक दौऱ्यात आपल्या जुन्या सहकारी, माजी मंत्री पुष्पाताई हिरे यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली होती. तेव्हा सबंध हिरे कुटुंबीयांनी त्यांचे स्वागत केले होते. पक्षाचे नाशिकचे प्रभारी जयंत पाटील यांनीही गेल्या आठवड्यातील आपल्या दौऱ्यात हिरे यांची भेट घेतल्याने या चर्चेला उधाण आले होते. 

भाजपला आमच्या राजकीय प्रभावाचे महत्व वाटत नाही. सध्याची स्थिती पाहता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची धोरणे व नेतृत्व सामान्यांचे प्रश्‍न समजुन घेणारे आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये परतणार आहोत - युवा नेते अद्वय हिरे

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com