पालकमंत्री गिरीष महाजन मॅरेथॉनमध्ये पाच किलोमीटर धावले 

नियमित व्यायाम, समतोल आहार आणि तदुरूस्तीसाठी नागरीकांमध्ये नेहमी चर्चेत असलेले नाशिकचे पालकमंत्री गिरीष महाजन आज येथील मॅरेथॉन स्पर्धेत पाच किलोमीटर अंतर धावले. नागरिक, खेळाडू यांच्या समवेत उत्साहाने धावतांना ते अन्य धावपटूंना प्रोत्साहनही देत होते.
पालकमंत्री गिरीष महाजन मॅरेथॉनमध्ये पाच किलोमीटर धावले 

नाशिक : नियमित व्यायाम, समतोल आहार आणि तदुरूस्तीसाठी नागरीकांमध्ये नेहमी चर्चेत असलेले नाशिकचे पालकमंत्री गिरीष महाजन आज येथील मॅरेथॉन स्पर्धेत पाच किलोमीटर अंतर धावले. नागरिक, खेळाडू यांच्या समवेत उत्साहाने धावतांना ते अन्य धावपटूंना प्रोत्साहनही देत होते.

नाशिकमध्ये आज वाहतुक नियमांविषयी जागृकता वाढावी, यासाठी पोलिस आयुक्‍तालयातर्फे मॅरेथॉन स्पर्धा झाली. या स्पर्धेला मोठा प्रतिसाद मिळाला. नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आणि सर्व घटकांचा सहभाग हे मॅरेथॉनचे वैशिष्ट होते. मात्र खरे वेगळेपण ठरले, ते पालकमंत्री गिरीष महाजन, खासदार हेमंत गोडसे, महापौर रंजना भानसी, आमदार सीमा हिरे यांसह विविध राजकीय नेत्यांची उपस्थिती. यामध्ये कौतुकाचा विषय ठरले, ते मंत्री गिरीष महाजन.

स्पर्धेसाठी ते पहाटे साडे पाचलाच दाखल झाले होते. अन्य राजकीय नेते नेहमीच्या खादीच्या पोषाखात असतांना, महाजन यांनी मात्र सॅंडो आणि जॉगिंगची पॅन्ट व स्पोर्टस शूज परीधान केले होते. ते प्रत्येक अधिकाऱ्यांला नागरीकांना भेटत होते. त्यांच्याशी संवाद करीत होते. ते धावणार असल्याचे समजल्यावर अन्य पोलिस अधिकारी आणि नागरिकांची उत्सुकता वाढली.... आणि मॅरेथॉन सुरू झाल्यावर ते खरोखरच सलग पाच किलोमीटर धावले. अतिशय उत्साहाने त्यांनी हा टप्पा पूर्ण केला. यावेळी पोलिस आयुक्‍त डॉ. रवींद्र कुमार सिंघल, अभिनेत्री संयमी खेर हिनेही त्यांचे अभिनंदन केले. 

गिरीष महाजन आपल्य आरोग्या विषयी आणि शारीरीक तंदुरूस्ती विषयी सतत जागरूक असतात. आपल्या गाडीतच डंबेल्सचा सेट बागळतात. धावपळीच्या व व्यग्र दिनक्रमातून वेळ मिळेल तेव्हा व्यायाम करतात. आहारावरही त्यांचे लक्ष असते. दिवसभर वेळ न मिळाल्यास घरी परतताना अगदी महामार्गावर गाडी सोडून धावतांना अनेकांनी त्यांना पाहिले आहे. आज मॅरेथॉनमधील सहभागाने नाशिककरांना त्याची प्रचिती आली
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com