गिरीश महाजन रविवारी धावले; सोमवारी तासभर नाचले 

बहुतांश मंत्री चर्चेत राहतात ते राजकीय घोषणा अन्‌ प्रतिस्पर्ध्यांना डिवचल्याने. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन मात्र चर्चेत असतात ते वेगळ्याच कारणांनी. महाजन काल नाशिकमध्ये मॅरेथाॅनमध्ये धावले, आज शिवजयंतीच्या कार्यक्रमात ते लेझीमच्या पथकासमवेत तासभर लेझीम खेळले. उत्साही कार्यकर्त्यांनीही टाळ्या वाजवत महाजनांना प्रोत्साहन दिले.
गिरीश महाजन रविवारी धावले; सोमवारी तासभर नाचले 

नाशिक : बहुतांश मंत्री चर्चेत राहतात ते राजकीय घोषणा अन्‌ प्रतिस्पर्ध्यांना डिवचल्याने. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन मात्र चर्चेत असतात ते वेगळ्याच कारणांनी. महाजन काल नाशिकमध्ये मॅरेथाॅनमध्ये धावले, आज शिवजयंतीच्या कार्यक्रमात ते लेझीमच्या पथकासमवेत तासभर लेझीम खेळले. उत्साही कार्यकर्त्यांनीही टाळ्या वाजवत महाजनांना प्रोत्साहन दिले. 

जलसंपदा मंत्री गिरीष महाजन नाशिकचे पालकमंत्री आहेत. राज्याचे विविध मंत्री चर्चेत राहतात ते राजकीय विधाने, वाद-विवाद आणि विरोधक व त्यांच्यातील आरोप, प्रत्यारोपांमुळे. गिरीश महाजन देखील वारंवार व सतत चर्चेत राहतात. मात्र, कधी वैद्यकीय शिबारांच्या उपक्रमांमुळे, कधी बिगर राजकीय उपक्रमांत सक्रीय राहिल्याने. रविवारी पोलिस आयुक्तालयातर्फे वाहतुक नियमांच्या जनजागृतीसाठी झालेल्या स्पर्धेत महाजन यांनी पाच किलोमीटरची मॅरेथॉन पूर्ण केली. त्याची चर्चा खूप झाली. 

आज शहरात दोन ठिकाणी शिवजयंतीच्या मिरवणुकीत त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची पालखी वाहिली. दोन- अडीच किलोमीटर ते नागरीकांसमवेत चालले. नागरिकांच्या गाठीभेटी घेतल्या. महात्मा गांधी रस्त्यापर्यंत ते चालत गेले. त्यानंतर शासकीय वाहनाने ते नाशिक रोडच्या मिरवणुकीत सहभागी झाले. येथे ते तासभर लेझीम पथकात सहभागी झाले. पालखी सोहळ्यात विविध संस्था, महाविद्यालयांच्या पथकांचा सहभाग होता. त्यांच्यात मिसळून महाजन बराच वेळ लेझीम खेळले. 

केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे, भापजचे शहराध्यक्ष आमदार बाळासाहेब सानप, महापौर रंजना भानसी, उपमहापौर प्रथमेश गिते, आमदार सीमा हिरे, आमदार डॉ. अपूर्व हिरे, नाशिक शिवजयंती समितीचे अध्यक्ष सुनिल बागुल, नाशिक रोड समितीचे अध्यक्ष यांसह विविध नेते उपस्थित होते. या नेत्यांचा सहभाग मात्र मिरवणुकीत चालण्याएव्हढाच होता. 

''छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्व प्रकारचे भेद बाजूला सारून रयतेला सुखी ठेवण्याचे कार्य केले. देशाला वैभवशाली करण्यासाठी शिवरायांचा हा आदर्श युवकांनी डोळ्यासमोर ठेवावा. शिवाजी महाराज हे खऱ्या अर्थाने रयतेचे राजे होते. त्यांचे कार्य केवळ देशासाठीच नव्हे तर जगासाठी आदर्श आहे. रयतेचा राजा, जाणता राजा, प्रजाहितदक्ष राजा कसा असावा, हे त्यांनी कार्यातून दाखवून दिले आहे," असे महाजन यावेळी बोलताना म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com