परिवहन मंत्री दिवाकर रावतेंची अवैध प्रवासी वाहनांवर 'आॅन द स्पॉट' कारवाई 

अवैध प्रवासी वाहतुकीमुळे निष्पाप जिवांचा बळी जाण्याचे प्रकार वाढत असल्याने अशा अवैध प्रवासी वाहतुकीला आळा घालण्यासाठी राज्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी पुढाकार घेतला आहे. राज्यात सुमारे 4 लाख अवैध प्रवासी वाहतुक करणारी वाहने असून अशा वाहनांवर कारवाईची मोहिम त्यांनी सुरू केली आहे. या मोहिमेतंर्गत संबंधित वाहनाचा परवाना नूतनीकरण करण्यात येणार असुन त्या माध्यमातून वाहनचालकाचा रोजगारही हिरावला जाणार नाही. तसेच शासनाच्या महसुलात सुद्धा वाढ होणार आहे.
परिवहन मंत्री दिवाकर रावतेंची अवैध प्रवासी वाहनांवर 'आॅन द स्पॉट' कारवाई 

अकोला : 16 फेब्रुवारी....वेळ सकाळी दहा वाजताची...20 वाहनांचा ताफा पातूर तालुक्यातील भंडारज रस्त्याने निघाला...रस्त्यावर काही अवैध प्रवासी वाहतुक करणारे आॅटो चालक दिसताच शासकीय ताफा रस्त्यात थांबतो आणि थेट राज्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते गाडीतून खाली उतरून अवैध प्रवासी वाहतुक करणाऱ्या आॅटो चालकाला थांबवून त्यांची कानउघाडणी करीत कारवाईचे आदेश देतात......परिवहन मंत्री दिवाकर रावतेंनी आज येथे केलेल्या या 'आॅन द स्पॉट' कारवाईने प्रशासकीय यंत्रणाही खडबडून जागी झाली. 

अवैध प्रवासी वाहतुकीमुळे निष्पाप जिवांचा बळी जाण्याचे प्रकार वाढत असल्याने अशा अवैध प्रवासी वाहतुकीला आळा घालण्यासाठी राज्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी पुढाकार घेतला आहे. राज्यात सुमारे 4 लाख अवैध प्रवासी वाहतुक करणारी वाहने असून अशा वाहनांवर कारवाईची मोहिम त्यांनी सुरू केली आहे. या मोहिमेतंर्गत संबंधित वाहनाचा परवाना नूतनीकरण करण्यात येणार असुन त्या माध्यमातून वाहनचालकाचा रोजगारही हिरावला जाणार नाही. तसेच शासनाच्या महसुलात सुद्धा वाढ होणार आहे. 

ही मोहिम यशस्वी करण्यासाठी परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी राज्यातील शिवसेनेच्या सर्व आमदार, खासदार, जिल्हाप्रमुख, तालुकाप्रमुखांसह प्रादेशिक परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांना पत्र देऊन आपापल्या जिल्ह्यातील अवैध प्रवासी वाहनांचे परवाने नुतनीकरण करण्याचे आवाहन केले आहे. 

पातूर तालुक्यातील भंडारज येथे गारपीटग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी परिवहन मंत्री रावते काल जिल्ह्यात आले होते. यावेळी त्यांच्यासोबत शिवसेनेचे आमदार गोपीकिशन बाजोरिया, सहाय्यक संपर्क प्रमुख श्रीरंगदादा पिंजरकर, जिल्हा प्रमुख नितीन देशमुख, ॲड. अनिल काळे, जिल्हा परिषदेचे सदस्य महादेवराव गवळे, डॉ. विनीत हिंगणकर, गोपाल दातकर, महापालिकेचे गटनेते राजेश मिश्रा, तरूण बगेरे, ज्योत्स्ना चोरे, नगरसेवक शशिकांत चोपडे, मंगेश काळे, नितीन मिश्रा, शुभांगी किनगे, देवश्री ठाकरे, सरिता वाको आदी पदाधिकारी उपस्थित होते. 

रावते यांचा वाहनांचा ताफा भंडारज मार्गाने जात असताना त्यांना रस्त्यावर अवैध प्रवासी वाहतुक करणारी वाहने दिसताच त्यांनी गाडी थांबविण्याचे आदेश दिले. थेट रस्त्यावर उतरत रावतेंनी अवैध प्रवासी वाहतुक करणाऱ्या आॅटो चालकांची कानउघाडणी केली. 

''रोजगारासाठी तुम्ही वाहन चालविता पण विनापरवाना वाहन चालविणे चुकीचे असुन यात तुमचेच नुकसान आहे. एखाद्या वेळी दुर्देवाने अपघात झाल्यास प्रवाशांसोबतच तुमचाही जीव धोक्यात येऊ शकतो. परवाना नसल्याने तुम्हाला कुठलीही आर्थिक मदत मिळणार नसुन यात तुमचेच नुकसान आहे," असा हितोपदेश दिवाकर रावते यांनी संबंधित आॅटोचालकाला दिला. 

वाहनाचा परवाना नुतनीकरण करून सुरक्षीत प्रवास करा, मी तुमच्याच भल्यासाठी बोलतोय असा सल्ला रावते यांनी दिल्यावर वाहनचालकाने आपली चूक कबुल करीत परवाना नुतनीकरण करण्याची ग्वाही दिली. परिवहन मंत्र्यांच्या या धडक कारवाईने प्रशासकीय यंत्रणा मात्र खळबळून जागी होत शहरातील वाहनांवर कारवाई सुरू झाली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com