व्यग्र दिनक्रमातून वेळ काढून धनंजय मुंडेंनी घेतली भगिनीची भेट

राजकीय नेत्यांना सततच्या धावपळीमुळे कुटुंब व नातलगांकडे लक्ष द्यायला वेळ नसतो. विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनाही आपल्या नातलागांना वेळ देता येत नाही. पण रविवारी एका जाहीर सभेसाठी मुंडे कामोठे (नवी मुंबई) येथे आले होते. याच परिसरात त्यांच्या बहिण राहतात. त्यामुळे मुंडे यांनी आवर्जून बहिणीला भेटण्यासाठी आपला व्यग्र दिनक्रम काहीकाळ बाजूला ठेवला.
व्यग्र दिनक्रमातून वेळ काढून धनंजय मुंडेंनी घेतली भगिनीची भेट

मुंबई : राजकीय नेत्यांना सततच्या धावपळीमुळे कुटुंब व नातलगांकडे लक्ष द्यायला वेळ नसतो. विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनाही आपल्या नातलागांना वेळ देता येत नाही. पण रविवारी एका जाहीर सभेसाठी मुंडे कामोठे (नवी मुंबई) येथे आले होते. याच परिसरात त्यांच्या बहिण राहतात. त्यामुळे मुंडे यांनी आवर्जून बहिणीला भेटण्यासाठी आपला व्यग्र दिनक्रम काहीकाळ बाजूला ठेवला.

मुंडे यांना एकूण तीन सख्ख्या बहिणी आहेत. चार भावंडांमध्ये मुंडे हे सर्वात धाकटे. त्यांच्या पेक्षा थोरल्या असलेल्या उर्मिला त्रिंबकराव केंद्रे या कामोठे येथे राहतात. कामोठे हा सर्वसामान्य रहिवाशांची लोकवस्ती असलेला परिसर. उर्मिला केंद्रे यांचे घर सुद्धा सामान्य कुटुंबाप्रमाणेच. कोणताही बडेजाव नाही. अशा या साध्या कुटुंबामध्ये मुंडे यांनी काही वेळ काढला. भाऊ येणार म्हणून ऊर्मिला यांनी गडबडीत जेवण बनविले होते. मुंडे यांनीही गडबडीतच भोजन केले. मुंडे दुपारचे पोटभर जेवण करतात. रात्री ते शक्यतो जेवण करतच नाहीत. पण तरीही बहिणीने बनविलेल्या भोजनाचा आस्वाद त्यांनी आवर्जून घेतला. 
भोजन करीत असतानाही त्यांना कार्यकर्ते, नेते, अधिकारी यांचे सतत फोन येत होते. फोनवर बोलण्यातच त्यांचा बराच वेळ जात होता. त्यामुळे जेमतेम पंधरा मिनिटांच्या भेटीत या भावा - बहिणींचे फारसे बोलणे होऊ शकले नाही. 

'परीक्षा झाल्यानंतर जान्हवीला (म्हणजे मुंडे यांच्या कन्येला) माझ्याकडे पाठवा', अशी विनंती ऊर्मिलाताईंनी केली. 'हो. पाठवतो.' असा प्रतिसाद मुंडे यांनी दिला. माझा भाऊ सतत धावपळीत असतो. त्यामुळे खूप दुर्मिळ भेट होत असते. रक्षा बंधन, भाऊबिजेलाही प्रत्येकवेळी भेट होतेच असे नाही. पण गेल्या वेळी पुण्यात रक्षाबंधनाच्या दिवशी भेट झाल्याचे` ऊर्मिला यांनी 'सरकारनामा'शी बोलताना सांगितले.

राजकीय - सार्वजनिक क्षेत्रात धावपळ एवढी असते की नातेवाईकांना भेटता येत नाही. कामोठ्याच्या या कार्यक्रमासाठी येणार असल्याने ताईच्या घरी धावती भेट देऊया, असे ठरविले होते. जाहीर कार्यक्रम संपल्यानंतर भेटणार होतो. पण कार्यक्रमाला सुरूवात होण्यास काही वेळ असल्याने कार्यक्रमाच्या अगोदरच ताईकडे गेलो, असे मुंडे यांनी सांगितले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com