'त्या' क्लिप संबंधी स्वतः धनंजय मुंडेंचीच पोलीसात तक्रार

'त्या' क्लिप संबंधी स्वतः धनंजय मुंडेंचीच पोलीसात तक्रार

मागील तीन दिवसांपासुन व्हॉट्सअप व इतर सोशल मिडीयाद्वारे फिरणारी ऑडिओ क्लिप ही आपल्या आवाजाची नक्कल करून बनावट रित्या तयार केली असल्याची तक्रार स्वतः विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनीच परळी शहर पोलीस ठाण्यात दिली आहे. या प्रकरणी माझी बदनामी करण्याकरीता व समाजातील आपली प्रतिमा मलिन करण्याच्या दृष्टीने बनावट ध्वनिफित बनवुन तिचा प्रचार व प्रसार करणार्‍या अज्ञान व्यक्ती विरूध्द भारतीय दंड संहिता तसेच माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.

परळी : मागील तीन दिवसांपासुन व्हॉट्सअप व इतर सोशल मिडीयाद्वारे फिरणारी ऑडिओ क्लिप ही आपल्या आवाजाची नक्कल करून बनावट रित्या तयार केली असल्याची तक्रार स्वतः विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनीच परळी शहर पोलीस ठाण्यात दिली आहे. या प्रकरणी माझी बदनामी करण्याकरीता व समाजातील आपली प्रतिमा मलिन करण्याच्या दृष्टीने बनावट ध्वनिफित बनवुन तिचा प्रचार व प्रसार करणार्‍या अज्ञान व्यक्ती विरूध्द भारतीय दंड संहिता तसेच माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणीही त्यांनी केली आहे. 

मागील तीन दिवसांपासुन सोशल मिडीयाद्वारे एक ऑडिओ क्लिप फिरत असुन त्यात धनंजय मुंडे यांनी पंतप्रधान व मुख्यमंत्र्यांबद्दल काही अपशब्द बोलल्याचा उल्लेख आहे. सदर ध्वनिफित ही आपल्या आवाजाची नक्कल करून बनवण्यात आली आहे. त्यामागे आपली समाजातील प्रतिमा मलिन करण्याचा उद्देश आहे. सदर ध्वनिफितीतील आवाज आपला नसून कोणीतरी अज्ञात व्यक्तीने आपल्या राजकिय विरोधकांशी संगनमत करून आपल्याला बदनाम करण्यासाठी हे षडयंत्र रचल्याचे म्हटले आहे. आपण कोणाही बद्दल अपशब्द वापरले नसल्याने सदर बनावट ध्वनिफित प्रकरणाची सखोल चौकशी करावी, सदरील ध्वनिफित फॉरेन्सिक प्रयोगशाळेकडे पाठवून आवाज कोणाचा आहे, हे शोधुन त्याविरूध्द भारतीय दंड संहिता तसेच माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी दिलेल्या फिर्यादीत केली आहे. 

या प्रकरणी वाल्मिक कराड यांनी ही अशाच प्रकारे आणखी एक फिर्याद परळी शहर पोलीस ठाण्यात दिली आहे. याबाबत अज्ञात व्यक्ती विरूध्द धनंजय मुंडे यांच्या आवाजाची बनावट क्लिप करून बदनामी केल्या प्रकरणी  गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया रात्री उशीरापर्यंत सुरू होती.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com