मंत्रीपुत्र अविष्कार भुसेंच्या कल्पकतेतून गटारगंगेची झाली चौपाटी अन् सेल्फी पाॅईंट

इथल्या मोसम नदीची अक्षरशः गटारगंगा बनली होती. गेल्या चार महिन्यांपासून राज्यमंत्री दादा भुसे व युवासेनाप्रमुख अविष्कार भुसे नदीपात्रात सफाईला उतरले. आता ही गटारगंगेची चौपाटी झाली आहे अन् सांडपाण्याच्या डबक्याचा सेल्फी पाॅईंट बनलाय. नदीचे बदलले रुपडे पाहून हीच का ती मोसम नदी असा प्रश्न पडतो.
मंत्रीपुत्र अविष्कार भुसेंच्या कल्पकतेतून गटारगंगेची झाली चौपाटी अन् सेल्फी पाॅईंट

मालेगाव : इथल्या मोसम नदीची अक्षरशः गटारगंगा बनली होती. गेल्या चार महिन्यांपासून राज्यमंत्री दादा भुसे व युवासेनाप्रमुख अविष्कार भुसे नदीपात्रात सफाईला उतरले. आता ही गटारगंगेची चौपाटी झाली आहे अन् सांडपाण्याच्या डबक्याचा सेल्फी पाॅईंट बनलाय. नदीचे बदलले रुपडे पाहून हीच का ती मोसम नदी असा प्रश्न पडतो. 

मालेगाव शहरात प्रवेश करायचा तर सांडपाणी अऩ् घाण सोडली जात असल्याने गटारगंगा झालेल्या मोसम नदीपात्र ओलांडावे लागते. त्यामुळे नाक दाबुन जातानांच मालेगावविषयीही सहजगत्या संताप व्यक्त होत असे. आता ती हेटाळण बंद होणार आहे. स्वच्छ-सुंदर मालेगाव अभियानांतर्गत ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांच्या पुढाकारातून युवासेनेने नदी स्वच्छतेचे अग्निदिव्य पार पाडले. यामुळे सामान्य रुग्णालय ते आंबेडकर पूल नदीचा कायापालट झाला आहे. मोसमपूल परिसरात नदी सौंदर्यीकरण व चौपाटी साकारली आहे. आज (ता. 1) तिचे लोकार्पण होणार आहे. 

नदीस्वच्छतेचे शिवधनुष्य पेलताना युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांनी अविष्कार यांच्या मार्गदर्शनाखाली एक महिना मोसम नदीस्वच्छता केली. तत्पूर्वी, महापालिका, महसूल, पंचायत समिती, पोलिस प्रशासनाने एक दिवस मोसम स्वच्छता मोहीम राबविली होती. महिन्याच्या कार्यकाळात जेसीबी व ट्रॅक्‍टरच्या मदतीने सामान्य रुग्णालय ते आंबेडकर पुलादरम्यान संपूर्ण नदीपात्र स्वच्छ केले. सांडपाण्यासाठी एका बाजूने नाला कोरून उर्वरित जागेत चौपाटी तयार केली. स्वच्छता व सौंदर्यीकरणाच्या निमित्ताने पुरातन अहिल्याबाई होळकर पुलाला लाइट इफेक्‍ट्‌समुळे झळाळी मिळाली. युवा सेनेचे शहरप्रमुख व मंत्रीपुत्र अविष्कार भुसे यांच्या या उपक्रमात ईश्‍वर पवार, उमेश अहिरे, जिभाऊ रौंदळ, श्री जगताप यांनी सक्रीय भाग घेतला. 
 
हेटाळणीऐवजी ठरेल सेल्फी पॉइंट 
यापुर्वी दुर्गंधीमुळे पुलावरुन जातांना नाकावर हात ठेवून जावे लागत होते. हेटाळणीचा विषय बनला होता. तोच नदीचा परिसर आता हेटाळणीऐवजी सेल्फी पॉइंट होणार आहे. अहिल्याबाई होळकर पुलाचे बारकावे पिलर्सचे थ्रीडिझाइन व मजबूतपणा यामुळे प्रथमच निदर्शनास आला. सांडपाण्याचे डबके असलेल्या पुलाखाली मुले खेळताना, बागडताना दिसू लागली आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com