काँग्रेसची आता संविधान बचाव मोहिम : राहुल गांधी यांच्या उपस्थितीत 23 एप्रिलला सुरूवात

अखिल भारतीय काँग्रेस समितीने येत्या 23 एप्रिलपासून देशव्यापी संविधान बचाव मोहिम आखून केंद्र सरकारला घेरण्याची व्यूहरचना आखली आहे. काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्या उपस्थितीत दिल्लीत या मोहिमेची सुरूवात होणार आहे. देशातील काही बलात्कारांच्या घटना भाजपला अडचणीचे ठरलेल्या असताना संविधान बचाव मोहिमेमुळे मोदी सरकारवर दबाव टाकण्याचे काँग्रेसने ठरविल्याचे स्पष्ट झाले.
काँग्रेसची आता संविधान बचाव मोहिम : राहुल गांधी यांच्या उपस्थितीत 23 एप्रिलला सुरूवात

नागपूर : अखिल भारतीय काँग्रेस समितीने येत्या 23 एप्रिलपासून देशव्यापी संविधान बचाव मोहिम आखून केंद्र सरकारला घेरण्याची व्यूहरचना आखली आहे. काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्या उपस्थितीत दिल्लीत या मोहिमेची सुरूवात होणार आहे. देशातील काही बलात्कारांच्या घटना भाजपला अडचणीचे ठरलेल्या असताना संविधान बचाव मोहिमेमुळे मोदी सरकारवर दबाव टाकण्याचे काँग्रेसने ठरविल्याचे स्पष्ट झाले. 

''गेल्या काही वर्षात दलितांवरील अत्याचारात वाढ झाली आहे तसेच आरक्षणाच्या धोरणाबद्दल केंद्र सरकारची भूमिका संशयास्पद आहे. अनुसूचित जाती, जमाती, इतर मागासवर्ग व महिला वर्गाच्या हिताचे संरक्षणासाठी राज्यघटनेत अनेक तरतुदी आहेत. या राज्यघटनेला नख लावण्याचे काम केंद्रातील सरकारतर्फे प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरित्या होत असल्याने संविधान बचाव मोहिम हाती घेण्याची गरज पडली," अशी माहिती अ. भा. काँग्रेस समितीच्या अनुसूचित जाती सेलचे प्रमुख डॉ. नितीन राऊत यांनी 'सरकारनामा'शी बोलताना दिली.

काँग्रेसच्या या मोहिमेची सुरूवात दिल्लीतून होत असली तरी देशातील प्रत्येक जिल्ह्यात ही मोहिम राबविली जाणार आहे. देशातील अनुसूचित जातीप्रमाणेच अनुसूचित जमाती व इतर मागासवर्गीय (ओबीसी) वर्गालाही या मोहिमेत सामावून घेतले जाणार आहे. हे तिन्ही वर्ग काँग्रेसचे पारंपारिक मतदार राहिले आहेत. परंतु, गेल्या काही वर्षांपासून या मतपेटीवर भाजपने डल्ला मारला आहे. हा मतदार पुन्हा आपल्याकडे वळविण्यासाठी या मोहिमेचा उपयोग करून घेण्याचे काँग्रेसने ठरविले आहे.

या संदर्भात भूमिका स्पष्ट करताना डॉ. राऊत म्हणाले, ''गेल्या चार वर्षात विकास कामांपेक्षा गोरक्षा, दलित अत्याचार, आरक्षणासारख्या विषयावर केंद्र सरकार व त्यांचे मंत्री अधिक बोलत देत आहेत. संविधानातील मूल्यांना धक्का लावण्याचे काम होत आहे. याबद्दल खुद्द सर्वोच्च न्यायालयाच्या सन्माननीय न्यायमूर्तींनी वाचा फोडली आहे. मोदी सरकारला केवळ मनुचा अजेंडा राबवायचा आहे. 2025 मध्ये रा. स्व. संघाला 100 वर्षे पूर्ण होत आहेत. तोपर्यंत देशाला हिंदूराष्ट्र करण्याचा विडा उचलण्यात आला आहे. संविधानाच्या विरोधातील या भूमिकेला विरोध करण्यासाठी काँग्रेसने संविधान बचाव मोहिम हाती घेतली आहे.'' या मोहिमेत अनुसूचित जाती, जमाती व ओबीसी वर्गाला सामावून घेतले जाणार असल्याचे डॉ. राऊत यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com