भाजपच्या अगोदरच काँग्रेसचे उपवास अस्त्र

संसदेचे कामकाज होऊ न दिल्यामुळे भाजपने येत्या 12 एप्रिलला देशभर उपवास करण्याचे कार्यक्रम राबविणार आहे. त्यापूर्वीच काँग्रेसने 9 एप्रिलला भाजपच्या जनविरोधी धोरणांच्या विरोधात उपवास करण्याचे जाहीर करून भाजपची उपवासाची चाल निष्प्रभ करण्याचे ठरविल्याचे स्पष्ट झाले आहे.
भाजपच्या अगोदरच काँग्रेसचे उपवास अस्त्र

नागपूर : संसदेचे कामकाज होऊ न दिल्यामुळे भाजपने येत्या 12 एप्रिलला देशभर उपवास करण्याचे कार्यक्रम राबविणार आहे. त्यापूर्वीच काँग्रेसने 9 एप्रिलला भाजपच्या जनविरोधी धोरणांच्या विरोधात उपवास करण्याचे जाहीर करून भाजपची उपवासाची चाल निष्प्रभ करण्याचे ठरविल्याचे स्पष्ट झाले आहे.

नुकत्याच संपलेल्या संसदेच्या अधिवेशनात फारसे कामकाज झाले नाही. यामुळे भाजपच्या खासदारांनी या अधिवेशनादरम्यान वेतन व भत्ते घेणार नसल्याचे जाहीर केले आहे. तसेच या अधिवेशनात कामकाज न होण्यास काँग्रेस जबाबदार असल्याचा आरोप करण्यात आला आहे. संसदेचे कामकाज न झाल्याने भाजप येत्या 12 एप्रिलला प्रत्येक खासदाराच्या नेतृत्वात देशभरात लाक्षणिक उपवास करणार आहे. या उपवास आंदोलनावर प्रतिहल्ला करण्यासाठी काँग्रेसने येत्या 9 एप्रिलला उपवास करण्याचे जाहीर केले आहे. अ. भा. काँग्रेस समितीने तसे आदेश जिल्हा काँग्रेस समित्यांना दिले आहेत. त्यामुळे काँग्रेसचे कार्यकर्ते 9 एप्रिलला उपवास करण्याच्या तयारीत व्यग्र झाले आहेत.

नागपुरात संविधान चौकात हे उपवास आंदोलन केले जाणार आहे. नागपूर शहर काँग्रेस समितीचे अध्यक्ष विकास ठाकरे यांच्या नेतृत्वात नागपुरात उपवास आंदोलन होणार आहे. भाजपच्या धोरणामुळे समाजातील कोणताही समाज सुखी नाही. महागाई वाढत आहे. बेरोजगारी वाढत आहे. केंद्र व राज्यातील भाजप सरकारने राबविलेल्या जनविरोधी धोरणाच्या विरोधात काँग्रेस कार्यकर्ते उपवास करणार असल्याचे ठाकरे यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com