Marathi Political News Congress Bhavan Nashik Auction | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

राणा जगजितसिंह उस्मानाबादचे राष्ट्रवादीचे उमेदवार : पवारांची घोषणा
सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय शिंदे यांचा शरद पवार यांच्या उपस्थितीत बारामतीत राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश...
हेमामालिनी या मथुरा येथून निवडणूक लढविणार
नरेंद्र मोदी वाराणशीतून, अमित शहा हे गांधीनगरमधून, नितीन गडकरी नागपूरमधून आणि राजनाथसिंह हे लखनौमधून निवडणूक लढविणार

थकबाकीदार काँग्रेस भवनचा लिलाव टळला, नेत्यांचे हाॅटेल लिलावात

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 16 एप्रिल 2018

घऱपट्टी थकवणा-या विविध पन्नास नेते, व्य़वसायिक व संस्थांच्या मालमत्तांचा महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे लिलाव करणार आहेत. यामध्ये सव्वीस लाख रुपये थकबाकी असलेल्या काँग्रेस भवनचा लिलाव होता. मात्र, नेत्यांनी थकबाकी भरण्यास होकार दिल्याने तो तूर्त टळला.

नाशिक : घऱपट्टी थकवणा-या विविध पन्नास नेते, व्य़वसायिक व संस्थांच्या मालमत्तांचा महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे लिलाव करणार आहेत. यामध्ये सव्वीस लाख रुपये थकबाकी असलेल्या काँग्रेस भवनचा लिलाव होता. मात्र, नेत्यांनी थकबाकी भरण्यास होकार दिल्याने तो तूर्त टळला.

शनिवारी महापालिका आयुक्तांनी घोषणा केल्याप्रमाणे मोठ्या थकबाकीदारांवर आता महापालिका प्रशासनाची वक्रदृष्टी पडली आहे. यापुर्वीच काँग्रेस भवन सील करम्याची प्रक्रीया केली होती. त्यांच्याकडे सव्वीस लाख रुपये थकबाकी होती. नोटिशीनंतर पदाधिका-यांनी याबाबत प्रेदश नेत्यांकडे मदत मागीतली. त्यानंतर दहा लाख रुपयांची थकबाकी भरण्यात आली. उर्वरीत थकबाकीसाठी मुदतवाढ घेण्यात आली. त्यामुळे लिलावातील मालमत्तांच्या नोटीशीत त्यांचा समावेष टळला. सध्या स्थानिक काँग्रेस पदाधिकारी थकबाकीसाठी संकलन करीत आहेत. 

शनिवारी लिलावाच्या पन्नास मालमत्तांच्या नोटीशींत शहरातील प्रतिष्ठीत वसंतराव नाईक संस्थेशी संबंधीत शामराव केदार या बांधकाम व्यवसायिकाच्या चार मालमत्तांचा 20.79 लाखांच्या थकबाकीसाठी लिलाव होणार आहे. याशिवाय रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाच्या नेत्याच्या नाशिक रोडचे हाॅटेल, नाशिक जिल्हा सहकारी कांदा बटाटा भवनच्या इमारतीचा सेवा आॅटोमोटिव्ह संस्थेच्या ताब्यातील भाग, एका निवृत्त पोलिस निरिक्षकाची वडिलोपार्जित इमारत, राष्ट्रवादी काँग्रेससह विविध पक्षांच्या मालमत्ता व एका वर्तमानपत्राच्या सबंध कार्यालयाचाही समावेष आहे. महापालिका प्रशासनाने फक्त करवाढीवर भर न देता आतापर्यंत थकबाकी अदा न केलेल्या मालमत्ताधारकांवरही कारवाई करावी, ही अनेक वर्षांपासूनची मागणी दोन दिवसांत प्रत्यक्षात येत आहे. शहरात अशा 413 इमारती आहेत. त्यांच्या मालकांना आता घाम फुटला आहे. 
 

संबंधित लेख