भाजपची वैचारिक दिवाळखोरी छिंदममुळे उघड झाली : अशोक चव्हाण 

छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी अपशब्द उच्चारून भाजपचे नगर महापालिकेचे उपमहापौर श्रीपाद छिंदम यांनी स्वत:सह पक्षाची वैचारिक दिवाळखोरी उघड केली. त्यामुळे छिंदम यांच्यासोबतच भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनीदेखील शिवप्रेमींची जाहीर माफी मागायला हवी, अशी भूमिका काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली आहे.
भाजपची वैचारिक दिवाळखोरी छिंदममुळे उघड झाली : अशोक चव्हाण 

शिर्डी : छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी अपशब्द उच्चारून भाजपचे नगर महापालिकेचे उपमहापौर श्रीपाद छिंदम यांनी स्वत:सह पक्षाची वैचारिक दिवाळखोरी उघड केली. त्यामुळे छिंदम यांच्यासोबतच भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनीदेखील शिवप्रेमींची जाहीर माफी मागायला हवी, अशी भूमिका काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली आहे.
 
खासदार चव्हाण यांनी काल सायंकाळी शिर्डीत पत्रकारांशी संवाद साधला. विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, पक्षाचे प्रदेश सरचिटणीस विनायक देशमुख व पदाधिकारी या वेळी उपस्थित होते. नगरमध्ये शुक्रवारी (ता. 16) महापालिका कर्मचाऱ्यास प्रभागातील कामासंबंधी जाब विचारताना भाजपचे उपमहापौर छिंदम यांनी थेट छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी आक्षेपार्ह विधान केले होते. त्याचा चव्हाण यांनी समाचार घेतला. छिंदम यांनी माफी मागितली असली तरीही त्यासोबत पक्षाने माफीनामा द्यायला हवा, अशी मागणी चव्हाण यांनी केली. 

चव्हाण यांनी सरकारच्या धोरणांवरही या वेळी टीका केली. राज्य व केंद्रातील दोन्ही सरकार शेतकरीविरोधी आहेत. कर्जमाफीच्या मुद्यावर या सरकारने शेतकऱ्यांना रडविले. दुसरीकडे घोटाळे करणाऱ्या नीरव मोदीसारख्यांना सोडून दिले. शेतीविषयी अन्य प्रश्‍न घेऊन मंत्रालयात येणाऱ्यांनी आत्महत्या करू नयेत, म्हणून जाळ्या बसविण्याचे काम केले. मग, राज्यात दररोज कुठे ना कुठे आत्महत्या करणाऱ्यांसाठीही हे सरकार राज्यभर जाळ्या लावणार का, असा सवालही चव्हाण यांनी उपस्थित केला. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com