जखमी शेतकऱ्याला सहकार मंत्र्यांनी केली मदत

येथील होनमुर्गी फाट्याजवळ अपघातातील जखमी शेतकऱ्याला सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी मदत केली. सहकार मंत्री देशमुख हे निंबर्गी येथे नियोजित कार्यक्रमासाठी निघाले होते, शेतकऱ्यांचा अपघात झाल्याचे दिसल्यानंतर त्यांनी वाहन बाजूला घेतले. स्वत:च्या वाहनातून जखमी शेतकऱ्याला उपचारासाठी सोलापूरला पाठविले.
जखमी शेतकऱ्याला सहकार मंत्र्यांनी केली मदत

सोलापूर : येथील होनमुर्गी फाट्याजवळ अपघातातील जखमी शेतकऱ्याला सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी मदत केली. सहकार मंत्री देशमुख हे निंबर्गी येथे नियोजित कार्यक्रमासाठी निघाले होते, शेतकऱ्यांचा अपघात झाल्याचे दिसल्यानंतर त्यांनी वाहन बाजूला घेतले. स्वत:च्या वाहनातून जखमी शेतकऱ्याला उपचारासाठी सोलापूरला पाठविले. 

भीमाशंकर यल्लप्पा कंगारे (वय 55, रा. होनमुर्गी ता. दक्षिण सोलापूर) असे जखमी शेतकऱ्याचे नाव आहे. कंगारे हे गुरुवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास दुचाकीवरून भाजी घेऊन निघाले होते. चारचाकी वाहनाने मागून धडक दिल्याने ते खाली पडले. जखम झाल्याने रक्त येत होते. त्याच वेळी निंबर्गीच्या दिशेने सहकार मंत्री देशमुख यांचे वाहन निघाले होते. देशमुख यांनी लगेच स्वत:चे वाहन देऊन जखमी भीमाशंकर कंगारे यांना सोलापूरच्या शासकीय रुग्णालयाकडे उपचारासाठी पाठविले. शासकीय रुग्णालयात फोन करून जखमींवर उपचार करण्यासाठी डॉक्‍टरांशी संवाद साधला. मंत्री असल्याची किंवा कोणीतरी दुसरे अपघातग्रस्ताला बघेल ही भावना मनात न आणता स्वत: देशमुख यांनी सहकार्य केल्याबद्दल जमलेल्या गावकऱ्यांनी त्यांचे आभार मानले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com