काँग्रेसपेक्षा भाजपच्या कार्यकाळातच शेतकऱ्यांची तिप्पट प्रगती : देवेंद्र फडणवीस

''आॅनलाईन कर्जमाफीमुळे सरकारवर टीका झाली असली तरी आमच्या या निर्णयामुळे बँकांची बदमाशी व मध्यस्थांची दुकानदारी बंद करण्यात सरकारला यश आले आहे. गेली अनेक वर्ष सत्तेत असलेल्या काँग्रेसच्या कार्यकाळापेक्षा भाजपच्या साडेतीन वर्षांच्या कार्यकाळात शेतकऱ्यांची तिप्पट प्रगती झाली आहे. ही प्रगती केवळ कागदावरच नसुन दृष्य स्वरुपात आहे," असा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केला.
काँग्रेसपेक्षा भाजपच्या कार्यकाळातच शेतकऱ्यांची तिप्पट प्रगती : देवेंद्र फडणवीस

खामगाव : ''आॅनलाईन कर्जमाफीमुळे सरकारवर टीका झाली असली तरी आमच्या या निर्णयामुळे बँकांची बदमाशी व मध्यस्थांची दुकानदारी बंद करण्यात सरकारला यश आले आहे. गेली अनेक वर्ष सत्तेत असलेल्या काँग्रेसच्या कार्यकाळापेक्षा भाजपच्या साडेतीन वर्षांच्या कार्यकाळात शेतकऱ्यांची तिप्पट प्रगती झाली आहे. ही प्रगती केवळ कागदावरच नसुन दृष्य स्वरुपात आहे," असा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केला.

शासकीय योजनांची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहचवण्यासाठी बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथे चार दिवसीय कृषी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाचे उद्घाटन शनिवार (ता.17) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर राज्याचे कृषी मंत्री पांडुरंग फुंडकर, आमदार चैनसुख संचेती, गृह राज्यमंत्री रणजित पाटील, खासदार प्रतापराव जधाव, खासदार रक्षा खडसे, आमदार आशिष शेलार, आमदार संजय रायमूलकर, आमदार अ‍ॅड. आकाश फुंडकर, आमदार डॉ संजय कुटे, आमदार शशीकांत खेडकर, जिल्हा परिषद अध्यक्षा उमा तायडे, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास भाले, परभणी कृषी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. बी. वेंकटेश्वरलु यांच्यासह आमदार, खासदार यांच्यासह भाजपचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. 

यावेळी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, भाजप सरकारने शेतकऱ्यांच्या हितासाठी अनेक योजनांची यशस्वी अंमलबजावणी केली आहे. शेतकऱ्यांना यावेळी देण्यात आलेली कर्जमाफी ही मागच्या सरकारपेक्षा शेतकऱ्यांसाठी जास्त फायदेशीर ठरल्याचा दावा यावेळी त्यांनी केला. शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ देण्याची प्रक्रिया आॅनलाईन केल्यामुळे सरकारवर टीका झाली असली, तरी यामुळे बँकांची बदमाशी व मध्यस्थांची दुकानदारी बंद करण्यात सरकारला यश आल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. 

''सरकारची मदत थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होत आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरकारने दिलेल्या कर्जमाफीत संपूर्ण विदर्भासाठी 250 कोटी मिळाले होते. तर आमच्या सरकारने एकट्या बुलढाणा जिल्ह्यासाठी 1100 कोटी रुपयांपेक्षा अधिक रकमेची कर्जमाफी देऊन शेतकऱ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे.  भाजपच्या सरकारने शेतकऱ्यांसाठी काँग्रेसच्या सरकारपेक्षा तिप्पट आर्थिक तरतुद केली असुन त्यामुळेच शेतकऱ्यांची प्रगती झाली आहे. काँग्रेसच्या कार्यकाळात 20 ते 22 हजार कोटी तरतुद असायची, ती आता 66 हजार कोटी रुपयांवर गेली आहे." असेही मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com