महसुल कर्मचा-यांवर लक्ष ठेवण्यासाठी खासगी एजन्सी नेमू : चंद्रकांत पाटील यांचा इशारा

'महसूल कर्मचा-यांनो गैरव्यवहारांपासून दुर रहा. आता महसुल विभागाचा कारभार पारदर्शी करण्यासाठी गैरव्यवहारांवर बारीक लक्ष ठेवले जाईल. त्यासाठी खासगी एजन्सीची मदत घेण्याचा विचार सुरु आहे,' असा सावधगिरीचा इशारा आज महसुलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज येथे दिला.
महसुल कर्मचा-यांवर लक्ष ठेवण्यासाठी खासगी एजन्सी नेमू : चंद्रकांत पाटील यांचा इशारा

नाशिक : 'महसूल कर्मचा-यांनो गैरव्यवहारांपासून दुर रहा. आता महसुल विभागाचा कारभार पारदर्शी करण्यासाठी गैरव्यवहारांवर बारीक लक्ष ठेवले जाईल. त्यासाठी खासगी एजन्सीची मदत घेण्याचा विचार सुरु आहे,' असा सावधगिरीचा इशारा आज महसुलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज येथे दिला.

येत्या 1 मे रोजी महाराष्ट्र दिनापासून सात बारा संगणकीकरणाला सुरुवात करण्याचे शासकीय नियोजन असून त्या पार्श्‍वभूमीवर संगणकीकरणासह ऑनलाईन कामाच्या आढाव्यासाठी महसूल मंत्री जिल्हानिहाय बैठका घेत आहे. त्यानुसार आज जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात आढावा बैठकीत महसूल मंत्र्यांना हा इशारा दिला. विभागीय आयुक्त राजाराम माने, जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी, अप्पर जिल्हाधिकारी नीलेश सागर आदीसह विविध विभागाचे आधिकारी होते. पूर्णपणे प्रशासकीय स्वरुप असलेल्या बैठकीत सूचना, कामकाजातील अडचणी कर्मचाऱ्यांच्या अपेक्षापर्यत मुक्त चिंतन झाले. 

17 पैकी 7 तालुक्‍यातील संगणकीकरण पूर्ण झाले असून एप्रिल अखेरपर्यत नाशिक व मालेगाव या दोन तालुक्‍याचा अपवाद वगळता उर्वरित सर्व तालुक्‍याचे कामकाज पूर्ण करण्याचा प्रयत्न राहील, तसेच ई डिस्ट्रीक्‍ट उपक्रमात नाशिक राज्यात प्रथम आहे. शहरात आपले सरकार उपक्रमात शंभर टक्के दाखल्याचे कामकाज ऑनलाईन झाले आहे, अशी माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली. 

दाखल्यांचा फेरविचार व्हावा 
महसूल विभागाकडून दिल्या जाणाऱ्या विविध दाखल्यांच्या कामात यंत्रणेचा मोठा वेळ खर्ची पडतो. त्यामुळे सांस्कृतीक परवाना, रहिवास दाखले, तात्पुरते रहिवास प्रमाणपत्र, ज्येष्ठ नागरिकांचा दाखला यासह अनेक दाखल्यासाठी यंत्रणा राबविण्याची खरोखरच आवश्‍यकता आहे का? यासह महसूल विभागाकडील दाखल्यांच्या कामांचा फेरविचार करण्याची अपेक्षा विभागीय आयुक्त राजाराम माने यांनी महसूल मंत्र्यांकडे व्यक्त केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com