Marathi Political News Chagan Bhujbal Samir Bhujbal | Sarkarnama

छगन भुजबळ म्हणाले 'समीरला माझ्यासमोर आणू नका'

तुषार खरात 
गुरुवार, 1 मार्च 2018

ज्येष्ठ नेते छगन भुजबळ व त्यांचे पुतणे समीर भुजबळ यांच्यातील संबंध जिव्हाळ्याचे आणि सौहार्दाचे आहेत. छगन भुजबळ हे समीर भुजबळ यांच्याशी वडीलकीच्या नात्याने वागतात. काका-पुतण्याच्या नात्यामध्ये कुठल्याही प्रकारचा दुरावा निर्माण झालेला नाही. छगन भुजबळ यांना भेटीला जाणाऱ्या कार्यकर्त्यांशीही छगन भुजबळ यांनी समीर भुजबळ यांच्याविषयी सौहार्दाची आणि विश्वासाचीच भावना असल्याचे बोलून दाखवले आहे. काका - पुतण्याच्या नात्यात दुरावा निर्माण करण्याचे विरोधकांचे प्रयत्न यशस्वी होणार नाहीत -  संतोष कमोद, कार्यकर्ते समता परिषद, नाशिक 

मुंबई : 'या समीरला माझ्या समोर आणू नका. याच्यामुळेच माझ्यावर आज ही आफत ओढवली आहे', अशा शब्दांत छगन भुजबळ यांनी आपला पुतण्या समीर भुजबळ यांच्याबद्दल संताप व्यक्त केल्याचे समजते. खटल्याच्या सुनावणीनिमित्त छगन भुजबळ व समीर भुजबळ यांना काही दिवसांपूर्वी न्यायालयात आणण्यात आले होते. न्यायालयीन कामकाज सुरू होण्यापूर्वी समीर अचानक दिसल्यामुळे भुजबळ यांनी आपल्या अंतर्मनातील भावनांना मोकळी वाट करून दिली.

काँग्रेस – राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी सरकारच्या काळात छगन भुजबळ यांनी उपमुख्यमंत्री, गृहमंत्री, सार्वजनिक बांधकाम मंत्री इत्यादी खात्यांचे मंत्री म्हणून काम केले. या काळात समीर भुजबळ यांनी छगन भुजबळ यांच्या नावावर चुकीची कामे केल्याचे आरोप झाले आहेत. त्यांच्या आर्थिक व्यवहारांबाबतही तक्रारी झाल्या आहेत.

गेले काही वर्षे छगन भुजबळ व समीर भुजबळ तुरूंगात आहेत. जामीन मिळविण्यासाठी अनेक प्रयत्न करूनही भुजबळ काका – पुतण्यांची सुटका होत नाही. समीरमुळेच घोटाळे अंगलट आल्याची भावना छगन भुजबळ यांची झाली आहे. त्यामुळेच छगन भुजबळ हे समीर यांच्यावर कमालीचे नाराज आहेत. त्यातूनच संतापलेल्या छगन भुजबळ यांनी समीरला माझ्यासमोर आणू नका, असे सांगितल्याचे सूत्रांनी सांगितले. 

दोन्ही भुजबळांचे संबंध सौहार्दपूर्ण
नाशिक : ज्येष्ठ नेते छगन भुजबळ व त्यांचे पुतणे समीर भुजबळ यांच्यातील संबंध जिव्हाळ्याचे आणि सौहार्दाचे आहेत. छगन भुजबळ हे समीर भुजबळ यांच्याशी वडीलकीच्या नात्याने वागतात. काका-पुतण्याच्या नात्यामध्ये कुठल्याही प्रकारचा दुरावा निर्माण झालेला नाही. छगन भुजबळ यांना भेटीला जाणाऱ्या कार्यकर्त्यांशीही छगन भुजबळ यांनी समीर भुजबळ यांच्याविषयी सौहार्दाची आणि विश्वासाचीच भावना असल्याचे बोलून दाखवले आहे. काका - पुतण्याच्या नात्यात दुरावा निर्माण करण्याचे विरोधकांचे प्रयत्न यशस्वी होणार नाहीत, त्यामुळे अशा आशयाची चर्चा व वृत्त हे निखालस खोटे आहे, असे समता परिषदेचे कार्यकर्ते संतोष कमोद यांनी 'सरकारनामा'शी बोलताना सांगितले. 

संबंधित लेख