तर हजारो बेरोजगार राज्यभर रस्त्यावर उतरतील : रविकांत तुपकर

सरकारने 12 हजार पोलीस शिपाई पदाची भरती करण्याचे आश्वासन दिले होते. सत्तेवर येवून या सरकारला चार वर्ष झालीत, मात्र राज्यात कोठेही पोलीस भरती झाली नाही. पोलीस विभागात पोलीसांच्या हजारो जागा रिक्त आहे. रिक्त जागांमुळे पोलीसांवर ताण येत असुन हे सरकारला दिसत नाही का? असा सवाल उपस्थित करुन तातडीने पोलीस शिपाई पदाची भरती घेवून तरुणांना न्याय द्यावा अन्यथा राज्यभरातील बरोजगार तरुण रस्त्यावर उतरतील असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राज्याचे नेते रविकांत तुपकर यांनी दिला.
तर हजारो बेरोजगार राज्यभर रस्त्यावर उतरतील : रविकांत तुपकर

बुलढाणा : सरकारने 12 हजार पोलीस शिपाई पदाची भरती करण्याचे आश्वासन दिले होते. सत्तेवर येवून या सरकारला चार वर्ष झालीत, मात्र राज्यात कोठेही पोलीस भरती झाली नाही. पोलीस विभागात पोलीसांच्या हजारो जागा रिक्त आहे. रिक्त जागांमुळे पोलीसांवर ताण येत असुन हे सरकारला दिसत नाही का? असा सवाल उपस्थित करुन तातडीने पोलीस शिपाई पदाची भरती घेवून तरुणांना न्याय द्यावा अन्यथा राज्यभरातील बरोजगार तरुण रस्त्यावर उतरतील असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राज्याचे नेते रविकांत तुपकर यांनी दिला.

जिल्हा पोलीस अधिक्षक कार्यालयासमोर स्वाभिमानी विद्यार्थी संघटनेचे पश्चिम विदर्भ प्रमुख राणा चंदण यांच्या नेतृत्वात 600 विद्यार्थ्यांनी अन्नत्याग सत्याग्रह सुरु केला आहे. राणा चंदण यांच्या आंदोलनाचा आज तिसरा दिवस असून त्यांची प्रकृती खालावत चाचली आहे. विद्यार्थ्यांच्या आंदोलन मंडपाला स्वाभिमानीचे नेते रविकांत तुपकर यांनी भेट देवून राणा चंदन यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. यावेळी विद्यार्थ्यांनी प्रचंड घोषणाबाजी करीत सरकारचा निषेध केला. 

यावेळी तुपकर म्हणाले, "हे सरकार केवळ घोषणाबाज सरकार आहे. युवकांच्या हाताला काम देवू, छोटे उद्योग उभे करु, बेरोजगारांना नोकऱ्या देवू असे आश्वासन सरकारने दिले होते. मात्र, राज्यात एकाही बेरोजगाराला नोकरी देवू शकले नाही. त्यामुळे सरकार विरुद्ध तरुणांचा प्रचंड रोष आहे. बुलढाण्यात आज आंदोलन सुरु झाले उद्या तालुका तालुक्यातुन आणि नंतर जिल्ह्या जिल्ह्यातुन तरुण रस्त्यावर उतरतील तेव्हा या सरकारला असंतोषाला सामोरे जावे लागेल. बेरोजगारांच्या हाताला वेळीच काम द्या, पोलीस शिपाई भरती प्रक्रीया पुर्ण करुन युवकांना न्याय द्या अन्यथा ज्या शेतकरी, तरुण व बेरोजगार युवकांच्या मतांवर तुम्ही सत्तेवर आले तेच तरुण तुम्हाला सत्तेवरुन खाली खेचतील."

तुपकरांच्या आगमनाने विद्यार्थ्यांमध्ये जल्लोष
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर हे चार दिवसांपासून राज्याच्या दौऱ्यावर होते. दौरा आटोपून ते बुलडाण्यात आले असता त्यांनी अन्नत्याग आंदोलनाला भेट दिली. यावेळी उपस्थित शेकडो विद्यार्थ्यांनी एकच जल्लोष केला. तर रविकांत तुपकर यांनी आपल्या खास वऱ्हाडी शैलीत आक्रमक भाषण करीत सरकारवर चौफेर टिका केल्याने विद्यार्थी अक्षरश: पेटून उठले व जर या सरकारने वेळीच जागा न भरल्यास भाजपला मतदान करायचे नाही अशी तुपकरांच्या उपस्थितीत शपथ घेतली. विशेष म्हणजे विद्यार्थ्यांची आंदोलन मंडपात प्रचंड गर्दी होवून जिल्हाधिकारी कार्यालयाचा रस्ता जाम झाला होता. या अांदाेलनात युवकांसाेबतच युवतींची संख्या सुद्धा लक्षणीय होती. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com