Marathi Political News BJP Leader Yoga Guru | Sarkarnama

मोफत योग शिक्षणासाठी भाजप गटनेते स्वतः झाले योगशिक्षक 

संपत देवगिरे 
गुरुवार, 19 एप्रिल 2018

जागतिक योगदिन उपक्रमानिमित्त प्रभागात मोफत योगवर्ग सुरु करायचे होते. मात्र योगशिक्षकच मिळेना. त्यातुन मार्ग काढण्यासाठी भारतीय जनता पक्षाचे गटनेते संभाजी मोरुस्कर यांनी पत्नीसह योगशिक्षकाचे प्रशिक्षण घेतले. मोफत योगवर्ग सुरु केले. आता प्रभागात बारा ठिकाणी रोज तीनशे नागरीक आपला दिवस योगाने करतात. स्वतः मोरुस्करांचा दिवस सुरु होतो ओमकार आणि योगशिक्षणाने. एक वेगळा नगरसेवक म्हणुन त्यांच्याकडे पाहिले जाते. 

नाशिक : जागतिक योगदिन उपक्रमानिमित्त प्रभागात मोफत योगवर्ग सुरु करायचे होते. मात्र योगशिक्षकच मिळेना. त्यातुन मार्ग काढण्यासाठी भारतीय जनता पक्षाचे गटनेते संभाजी मोरुस्कर यांनी पत्नीसह योगशिक्षकाचे प्रशिक्षण घेतले. मोफत योगवर्ग सुरु केले. आता प्रभागात बारा ठिकाणी रोज तीनशे नागरीक आपला दिवस योगाने करतात. स्वतः मोरुस्करांचा दिवस सुरु होतो ओमकार आणि योगशिक्षणाने. एक वेगळा नगरसेवक म्हणुन त्यांच्याकडे पाहिले जाते. 

भारत सरकारने जागतिक योगदिन उपक्रम सुरु केल्यावर मोरुस्कर यांनी आपल्या प्रभागातही मोफत योगवर्ग सुरु करण्याचा प्रयत्न केला. त्यापूर्वी त्यांचा एक योगी एवढाच योगाशी परिचय होता. योगशिक्षक उपलब्ध होईना. त्यामुळे त्यांनी प्रारंभी आर्ट ऑफ लिव्हींगचे वर्ग केले. त्यातुन अपेक्षीत साध्य होईना. त्यानंतर त्यांनी पतंजलीचे वर्ग कले. त्यानंतर योग विद्या धामचे वर्ग करुन योगशिक्षक होण्यासाठी तीन महिन्यांचा वर्ग केला.

त्यात पत्नी आसावरी, कार्यकर्ते प्रभु पारगावकर, विजया कंकरेज, कांता बोराडे, रमेश पवार, अडसुळ आदी विविध कार्यकर्ते सहभागी झाले. त्यानंतर आलेल्या आत्मविश्‍वासाच्या बळावर 2016 मध्ये पहिला योगवर्ग सुरु केला. आता परिसरात बारा वर्ग सुरु असुन त्यात तीनशे साधक नियमीत योग करतात. त्यासगळ्याचा दिवस सुरु होतो तो ओमकाराचा उच्चार, गायत्रीमंत्र, महामृत्युंजयमंत्र, संघटनमंत्र आणि विश्वकल्याणाच्या प्रार्थनेने. त्यानंतर ओम मित्राय नमः उच्चारासह सूर्यनमस्कार व योगासने. 

महापालिकेच्या प्रभाग क्रमांक वीसचे नगरसेवक संभाजी मोरुस्कर तिसऱ्यांदा निवडुन आले आहेत. सध्या ते पक्षाचे गटनेते आहेत. महिंद्रा कंपनीत सहाय्यक महाव्यवस्थापक म्हणुन कार्यरत असलेले मोरुस्कर गेले पस्तीस वर्षे भाजपचे कार्यकर्ते आहेत. ते अभिनव वाचनालयाचे तसेच अटल अभ्यासिकेचे अध्यक्ष आहेत. महापालिकेतील पक्षाच्या अडलेल्या कामात, अडचणीत महासभेपासुन तर महापौरांच्या मदतीला धावून येतात. त्यात राजकारणात असुनही एक योगशिक्षक आणि योग प्रसारासाठी सक्रीय कार्यकर्ता हा पैलु त्यांची एक वेगळीच ओळख आणि प्रतिमा दाखवतो आहे. 

संबंधित लेख