लोकसभेसाठी कोकणात भाजपला नाना हवाय         

शिवसेनेने स्वबळाचा नारा दिल्यास कोकणातील रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात कोणाला उमेदवारी दयायची यावरून भाजपच्या गोटात चर्चा सुरू असून , मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कामाची उघड स्तुती करणारे अभिनेते नाना पाटेकर यांना उमेदवारी देण्याबाबत चाचपणी सुरू असल्याचे विश्वसनीय सूत्राकडून समजते.
लोकसभेसाठी कोकणात भाजपला नाना हवाय         

मुंबई : शिवसेनेने स्वबळाचा  नारा दिल्यास कोकणातील रत्नागिरी सिंधुदुर्ग  लोकसभा मतदारसंघात कोणाला उमेदवारी दयायची यावरून भाजपच्या गोटात चर्चा सुरू असून , मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कामाची उघड स्तुती करणारे अभिनेते नाना पाटेकर यांना उमेदवारी देण्याबाबत चाचपणी सुरू असल्याचे विश्वसनीय सूत्राकडून समजते.        

आपल्या वैशिष्ट्यपूर्ण अभिनय शैलीने मराठी आणि हिंदी सिनेजगतात ठसा उमटवणारे नाना पाटेकर यांनी समाजसेवेचे वसा जपला आहे. कुष्ठरोग्यांसाठी  काम करणाऱ्या बाबा आमटे यांच्या संस्थेला मदत करणाऱ्या नाना पाटेकर यांनी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत करणारी 'नाम' ही संस्था काढली आहे. अभिनेता मकरंद अनासपुरे यांच्या साथीने नाम संस्थेने राज्यातील अनेक गावे दत्तक घेतली आहेत. भंडारी समाजात जन्माला आलेले नाना पाटेकर मूळचे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील असून गेल्या आठवड्यात त्यांनी 'नाम'च्या माध्यमातून नाटळ या गावी सुरु असलेल्या नदी पुनरुज्जीवन कार्यक्रमात त्यांनी हिरहिरीने भाग घेतला. तसेच त्याच्या संस्थेने 2 पोकलेन दिले आहेत.

रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघात 22 ते 25 टक्के भंडारी समाज आहे. नाना पाटेकर यांनी निवडणूक लढविल्यास भंडारी समाजाबरोबर अन्य समाजातील मतदार नानांना पसंद करतील असा भाजपच्या वरीष्ठ नेत्याना वाटते. रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्हा हा  शिवसेनेचा बालेकिल्ला ओळखला जातो. नारायण राणे हे शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर काँग्रेसच्या तिकिटावर निलेश राणे यांना निवडून आणण्यात त्यांना यश मिळाले होते. परंतु, 2014 मध्ये शिवसेनेच्या विनायक राऊत यांनी नितेश राणे यांचा पराभव केला होता.  2019 साली नारायण राणे यांचा स्वाभिमान पक्ष हा 'एनडीए' मध्ये असला तरी भाजपला या मतदारसंघात स्वतःचा उमेदवार हवा आहे. 

मुख्यमंत्री फडणविस यांच्या 'गुड बुक' मध्ये असलेला नाना पाटेकर यांनी निवडणूक लढवावी अशी चाचपणी सुरू असल्याचे समजते. मात्र, 'मी  बाळासाहेब ठाकरे यांच्यावर निस्सीम प्रेम करणारा शिवसैनिक,' असे  बोलून दाखविणारे नाना पाटेकर हे भाजपच्या गळाला लागतील का?, शिवसेनेसोबत उघड राजकीय विरोध स्वीकारतील का? आणि मुख्य म्हणजे ते  निवडणूक लढवीण्यास तयार होतील का?, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com