भाजपमध्ये दलित नेतृत्व नाराज? माजी मंत्री इंद्रेश गजभियेंनी व्यक्त केली खदखद

गेल्या चार वर्षांत दलितांवर झालेले हल्ले तसेच अॅट्रासिटी ऍक्‍टबद्दल सर्वोच्च न्यायालयात केंद्र सरकारने मांडलेल्या भूमिकेबद्दल भाजपमधील दलित नेतृत्व नाराज असल्याची भावना मध्यप्रदेशातील भाजपचे नेते व माजी मंत्री इंद्रेश गजभिये यांनी नागपुरात पत्रकार परिषदेत व्यक्त केली.
 भाजपमध्ये दलित नेतृत्व नाराज? माजी मंत्री इंद्रेश गजभियेंनी व्यक्त केली खदखद

नागपूर : गेल्या चार वर्षांत दलितांवर झालेले हल्ले तसेच अॅट्रासिटी ऍक्‍टबद्दल सर्वोच्च न्यायालयात केंद्र सरकारने मांडलेल्या भूमिकेबद्दल भाजपमधील दलित नेतृत्व नाराज असल्याची भावना मध्यप्रदेशातील भाजपचे नेते व माजी मंत्री इंद्रेश गजभिये यांनी नागपुरात पत्रकार परिषदेत व्यक्त केली.

येत्या 14 एप्रिलला दिल्लीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचे उद्‌घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. दिल्लीतील 26, अलीपूर मार्गावरील बंगल्यात डॉ. आंबेडकर यांचे निधन झाले. त्या ठिकाणी हे स्मारक बांधण्यात आले आहे. याबद्दलची माहिती देताना इंद्रेश गजभिये यांनी देशात दलितांवर होत असलेल्या हल्ल्यांचाही निषेध केला. ते म्हणाले, "दलितांवर होत असलेल्या हल्ल्यानंतरही भाजपमध्ये वरिष्ठ पातळीवर काहीही कारवाई झाली नाही. गुजरात, राजस्थान, उत्तरप्रदेशांमध्ये दलितांवर मोठ्या प्रमाणावर हल्ले झाले परंतु भाजपचे वरिष्ठ नेतृत्व चुप्पी साधून राहिले. नुकताच सर्वोच्च न्यायालयाने अॅट्रॉसिटी अॅक्‍ट कमजोर करणारा निकाल दिला. आता तक्रारीनंतर लगेच कारवाई न करता वरिष्ठ पोलीस अधिकारी चौकशी करणार आहे. हा निकाल दलितांवर अन्याय करणारा तसेच या कायद्याचे महत्त्वच नाकारणारा आहे.'' या संदर्भात केंद्र सरकारच्या वकिलाने सर्वोच्च न्यायालयात योग्यरितीने बाजू मांडली नसल्याचा आरोप गजभिये यांनी केला.

या घटनांमुळे भाजपमधील दलित नेतृत्व निश्‍चितपणे नाराज असल्याचे सांगून ते म्हणाले, दलितांच्या समस्या व त्यांच्या भावनांबद्दल भाजप गंभीर आहे, असे वाटत नाही. नुकत्याच झालेल्या राज्यसभा निवडणुकीत एकाही दलिताला भाजपने उमेदवारी दिली नाही. या सर्व बाबींची दखल भाजपच्या नेतृत्वाने घ्यावी, असे आवाहन गजभिये यांनी केले. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com