भाजपसे बेटी बचाअाे : भारिप-बहुजन महासंघ करणार आज पुण्यात आंदोलन

भाजप सरकार बेटी बचाओ, बेटी पढाओ घोषणा देत असते. मात्र, आता भाजपसे बेटी बचाओ असे म्हणायची वेळ आली अाहे, असे भारिप-बहुजन महासंघाचे म्हणणे आहे.उन्नाव व कठूआ येथील अत्याचाराच्या घटनांच्या निषेधार्थ आज रविवार (ता.15) रोजी सायंकाळी 5 वाजता पुणे येथील गुडलक चौकात (गोखले स्मारक चौक) भारिप बहुजन महासंघाच्या वतीने निदर्शने केली जाणार असल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष अशोक सोनोने यांनी 'सरकारनामा’ ला दिली आहे.
भाजपसे बेटी बचाअाे : भारिप-बहुजन महासंघ करणार आज पुण्यात आंदोलन

खामगाव : भाजप सरकार बेटी बचाओ, बेटी पढाओ घोषणा देत असते. मात्र, आता भाजपसे बेटी बचाओ असे म्हणायची वेळ आली अाहे, असे भारिप-बहुजन महासंघाचे म्हणणे आहे. उन्नाव व कठूआ येथील अत्याचाराच्या घटनांच्या निषेधार्थ आज रविवार (ता.15) रोजी सायंकाळी 5 वाजता पुणे येथील गुडलक चौकात (गोखले स्मारक चौक) भारिप बहुजन महासंघाच्या वतीने निदर्शने केली जाणार असल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष अशोक सोनोने यांनी 'सरकारनामा’ ला दिली आहे.

असिफा (जम्मू) व उन्नाव मधील पीडितांना न्याय मिळाला पाहिजे तसेच पाठीशी घालणाऱ्या बलात्कारी मनोवृत्तीचा आणि सरकारचा जाहीर निषेध करण्यासाठी भारिप-बहुजन महासंघाचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या आदेशाने हे आंदोलन केले जाणार आहे. ''भाजप सरकार बेटी बचाओ, बेटी पढाओ घोषणा देत असते. मात्र, आता भाजपसे बेटी बचाओ असे म्हणायची वेळ आली आहे. योगी आदित्यनाथ सरकारने माजी मंत्री चिन्मयनंद विरोधातील रेप केस मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. पीडिता याविरोधात दाद मागत आहे. अशीच दाद उन्नावच्या पीडित मुलीने आदीत्यनाथ सरकारकडे केली होती. त्याबदल्यात तिच्या पित्याचा मृतदेह तिला मिळाला. बलात्कारी आमदार सुरेश सिंग सेनगल मोकाट सोडला. जम्मू मधील असिफा नामक चिमुकलीचे अपहरण करून सामूहिक बलात्कार केला गेला. या अत्याचाराच्या समर्थनार्थ तिरंगा मार्च काढला गेला. एवढा अपमान राष्ट्रीय ध्वजाचा क्वचितच झाला असेल,'' असेही सोनोने याबाबत माहिती देताना म्हणाले. 

हिंस्र पाशवी संस्कृती विरोधात समतामूलक शांती आणि न्यायप्रिय विकसित समाजासाठी एकत्र येण्याची आता गरज असून पुणे येथील आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन सोनोने यांनी केले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com