राज्यपालांनी थोपटले महिला पत्रकाराचे गाल : वादग्रस्त बनवारीलाल पुरोहित यांचा लेखी माफीनामा 

महिला पत्रकाराच्या गालाला विनासंमती स्पर्श केल्याने तमिळनाडूचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित चांगलेच अडचणीत सापडले. त्यांच्या या कृतीचा सर्वत्र निषेध करण्यात आला. अखेर राज्यपालांनी संबिधित पत्रकाराची बुधवारी लेखी माफी मागितली. पुरोहित यांनी माफ केल्याचे सांगताना यामागील हेतूबद्दल मात्र तिने शंका उपस्थित केली.
राज्यपालांनी थोपटले महिला पत्रकाराचे गाल : वादग्रस्त बनवारीलाल पुरोहित यांचा लेखी माफीनामा 

चेन्नई : महिला पत्रकाराच्या गालाला विनासंमती स्पर्श केल्याने तमिळनाडूचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित चांगलेच अडचणीत सापडले. त्यांच्या या कृतीचा सर्वत्र निषेध करण्यात आला. अखेर राज्यपालांनी संबिधित पत्रकाराची बुधवारी लेखी माफी मागितली. पुरोहित यांनी माफ केल्याचे सांगताना यामागील हेतूबद्दल मात्र तिने शंका उपस्थित केली. 

तमिळनाडूतील अरुप्पूकोट्टईमधील देवांग आर्ट महाविद्यालयातील सध्या गाजत असलेल्या 'पदवीच्या बदल्यात सेक्‍स'प्रकरणातील आरोपी प्राध्यापिकेने राज्यपाल पुरोहित यांचे नाव घेतले होते. त्याचा खुलासा करण्यासाठी राज्यपालांनी आज पत्रकार परिषद बोलाविली होती. ती संपताना त्यांनी नवा वाद ओढवून घेतला. तेथे उपस्थित असलेल्या लक्ष्मी सुब्रह्मण्यम या पत्रकाराच्या प्रश्‍नाला उत्तर देण्याएवजी राज्यपालांनी तिच्या गालाला स्पर्श करीत थापटी मारली. राज्यपालांच्या या कृतीने ती अस्वस्थ झाली. या घटनेनंतर आपण अनेक वेळी तोंड धुतले, पण ही गोष्ट विसरू शकलो नाही, असे लक्ष्मीने सांगितले. राज्यपालांचा माफीनामा आपण स्वीकारला असला तरी या कृतीमागील त्यांच्या हेतूबद्दल अजूनही शंका वाटते, असे तिने म्हटले आहे. 

राज्यपालांच्या या वर्तनाने पत्रकारांमध्ये संताप व्यक्त केला. द्रमुकसह अन्य विरोधी पक्षांनीही याचा निषेध केला आहे. लक्ष्मीने मेलद्वारे आपल्या भावना राज्यपालांना कळविल्या. यामुळे अखेर पुरोहित यांना लक्ष्मी सुब्रह्मण्यमची लेखी माफी मागणे भाग पडले. 

'ती मला नातीसारखी'
लक्ष्मी सुब्रह्मण्यमला लिहिलेल्या माफीनाम्यात राज्यपालांनी म्हटले आहे की, तू मला नातीसारखी असून तुझ्या पत्रकारितेचे कौतुक म्हणून आपुलकीच्या नात्याने तुझे गाल थोपटले. या घटनेने तू दुखावली गेली, हे तुझ्याकडून समजले. याबद्दल मी माफी मागतो. तुझ्या भावना दुखावल्या गेल्याने मी दिलगिरी व्यक्त करतो. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com