Marathi Political News Assembly Session first day | Sarkarnama

विरोधकांच्या घोषणाबाजीने विधानभवन परिसर दणाणला : ठिय्या आंदोलन करत हल्लाबोल 

ब्रह्मा चट्टे 
सोमवार, 26 फेब्रुवारी 2018

राज्यासाठी महत्वपुर्ण असणाऱ्या अर्थसंकल्पीय आधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधानभवन परिसर विरोधकांच्या घोषणांनी दणाणून गेला. राज्यपालांच्या भाषणाचे मराठी भाषांतर नसल्याने गोंधळ करत विधानभवनाच्या आवारातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ विरोधकांनी ठिय्या आंदोलन केले. यावेळी विरोधकांनी सरकारविरोधी जोरदार घोषणाबाजी केली. 

मुंबई : राज्यासाठी महत्वपुर्ण असणाऱ्या अर्थसंकल्पीय आधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधानभवन परिसर विरोधकांच्या घोषणांनी दणाणून गेला. राज्यपालांच्या भाषणाचे मराठी भाषांतर नसल्याने गोंधळ करत विधानभवनाच्या आवारातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ विरोधकांनी ठिय्या आंदोलन केले. यावेळी विरोधकांनी सरकारविरोधी जोरदार घोषणाबाजी केली. 

आज अर्थसंकल्पीय आधिवेशनाचा पहिलाच दिवस आहे. राज्यपालांच्या भाषणाने अर्थसंकल्पीय आधिवेशनाला सुरवात होणार झाले. मात्र, राज्यपालांचे अभिभाषण मराठीत अनुवादित न करून सरकारने मराठी भाषेचा अवमान केला आहे असा आरोप करत सरकारचा निषेध करण्यासाठी विरोधकांनी राज्यपालांच्या अभिभाषणावर बहिष्कार टाकून सभात्याग केला. विधानभवनातील शिवरायांच्या प्रतिमेजवळ सरकार विरोधी घोषणा देऊन सरकारचा निषेध केला. काँग्रेस -  राष्ट्रवादीच्या आमदारांनी विधानभवन परिसारात असेलल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर बसून ठिय्या आंदोलन करत हल्लाबोल केला.

विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, राष्ट्रवादीचे गटनेते अजित पवार, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आदींसह काँग्रेस - राष्ट्रवादीच्या आमदारांनी सरकारविरोधी घोषणाबाजी केली. राज्यपालांचे अभिभाषण मराठीत अनुवादित न करून फडणवीस सरकारने मराठी भाषेचा अवमान करणाऱ्या या सरकारचा धिक्कार असो, या सरकारचे करायचे काय खाली मुंडी वर पाय, छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्या शिवसेना भाजप सरकारचा धिक्कार असो, मराठी भाषेचा आपमान करणाऱ्या शिवसेना भाजप सरकारचा धिक्कार असो, डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांचा आपमान करणाऱ्या सरकारचा धिक्कार असो' अशा घोषणा देत विरोधकांनी विधानभवन परिसर दणाणून सोडला.

दरम्यान, काँग्रेस- राष्ट्रवादीची वाढती जवळीक, शिवसेना आणि भाजपमध्ये वाढत असेला दुरावा, शेतकऱ्यांची कर्जमाफी, बोंडआळीने केलेली नुकसानभरपाई,  मंत्रालयातील आत्महत्या सत्र, गारपीट, धुळे येथिल शेतकरी धर्मा पाटील यांच्या आत्महत्या प्रकरणी पर्यटनमंत्री जयकुमार रावळ यांच्यावर झालेले आरोप या पार्श्वभूमीवर राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन वादळी ठरण्याची चिन्हे दिसत आहेत.

संबंधित लेख